मुंबई - अंधेरी येथील चकाला मेट्रो रेल्वे स्थानकाखाली एका धावत्या कारने अचानक पेट घेतला. या आगीत जीवितहानी झालेली नाही. मात्र, अचानक कारने पेट घेतल्याने वाहटुनकीची कोंडी झाली होती. तसेच बघ्यांची गर्दी देखील झाली होती. आज दुपारच्या सुमारास ही आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन आग विझवली आणि ट्रॅफिक पोलिसांनी वाहतुकीची कोंडी कमी केली.