कोलकाता, बेंगळुरू : कौटुंबिक वादातून बेंगळुरुच्या चार्टर्ड अकाऊंटंटने आधी पत्नीची हत्या केली नंतर विमान पकडून कोलकातातील सासुरवाड गाठली आणि सासूलाही गोळ्या घातल्या. यानंतर आरोपीने स्वत:लाही संपवून घेतले.
पोलिसांनी या प्रकरणाची माहिती दिली. आरोपी अमित अग्रवाल यांने आधी बेंगळुरुच्या महादेवपुरामधील घरी पत्नीची हत्या केली. यानंतर तो कोलकाता येथील सासरी गेला. तिथे गेल्यानंतर कडाक्याचे भांडण झाले. यावेळी त्याने सासूवर गोळ्या झाडल्या. सासऱ्यालाही मारायचा प्रयत्न केला मात्र ते बचावले. अमितने जशी सासूवर गोळी झाडण्यासाठी बंदूक काढली तसे सासरे घरातून बाहेरच्या बाजुला पळाले व दरवाजा लॉक केला. या घटनेची माहिती शेजाऱ्यांच्या मदतीने पोलिसांना देण्यात आली. जोपर्यंत पोलीस तिथे पोहचतील तोपर्यंत त्याने स्वत:वरही गोळी झाडून घेतली. अमितने सासूची हत्या आणि आत्महत्येसाठी एकाच बंदुकीचा वापर केला.
तपासणीवेळी पत्नीच्या खूनाचा खुलासाअमितचा मृतदेह तपासताना पोलिसांना त्याच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. यामध्ये त्याने बेंगळुरुमध्ये त्याच्या पत्नीलाही मारल्याचे लिहिले होते. पोलिसांनी तातडीने बेंगळुरु पोलिसांना याची माहिती दिली. तेथील पोलिसांनी अमितचे घर गाठत दरवाजा तोडला. आतमध्ये अमितची पत्नी शिल्पी अग्रवालचा किचनमध्ये मृतदेह पडला होता.
दोन वर्षांपूर्वी वेगळे झाले होतेबेंगळुरुच्या व्हाईटफिल्डचे डीसीपी अनुचेत यांनी सांगितले की, शिल्पीचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठविण्यात आला आहे. महादेवपुरा पोलीस ठाण्यामध्ये याचा गुन्हा दाखल झाला आहे. अमित व शिल्पी दोघे दोन वर्षांपूर्वीच वेगळे झाल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. त्यांना 10 वर्षांचा मुलगाही आहे. अमितने पत्नीच्या हत्येनंतर मुलाला कोलकाताला नेले आणि नातेवाईकाच्या घरी सोडून तो सासरी गेला.
अन्य महत्वाच्या बातम्या...
चिंगारी भडकली! चीनच्या TikTok ला टक्कर देणार भारतीय अॅप
अमेरिकेने दोस्ती निभावली! भारताच्या मदतीला धावली; चीन-पाकिस्तानचा मोठा कट उधळला
Maruti Suzuki ची नवीन सीएनजी कार लाँच; जाणून घ्या किंमत अन् फिचर्स
India China FaceOff: भारतद्वेष्ट्या चिनी जनरलनेच दिला हल्ल्याचा आदेश; अमेरिकी गुप्तहेरांचा दावा
'काहीतरी नवे येतेय'! चीनची कंपनी एकच धमाका करण्याच्या तयारीत; जाणून घ्या...