कारसाठी पत्नीला उपाशी ठेवल्याप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा

By रूपेश हेळवे | Published: March 19, 2023 04:25 PM2023-03-19T16:25:18+5:302023-03-19T16:26:31+5:30

याबाबत नेहा प्रज्योतीपती वास्टर ( वय २७, रा. रविवार पेठ) यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Case against four people including husband for starving wife for car | कारसाठी पत्नीला उपाशी ठेवल्याप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा

कारसाठी पत्नीला उपाशी ठेवल्याप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा

googlenewsNext

सोलापूर : कार व सोने घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत पत्नीचा छळ केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नेहा प्रज्योतीपती वास्टर ( वय २७, रा. रविवार पेठ) यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी नेहा यांचे प्रज्योतीपती यादगिरराव वास्टर याच्यासोबत विवाह झाला. विवाहानंतर आरोपी बलभीम यादगिरराव वास्टर, यादगिरराव विश्वनाथ वास्टर, वंदना सुनील भोरावत ( सर्व रा. जोशीवाडा, जियागुंडा, हैद्राबाद ) यांनी फिर्यादीला तुझ्या वडिलांनी लग्नात हुंडा दिला नाही, योग्य मानपान केला नाही. तुझ्या वडिलांनी दोन तोळ्याचे सोने दिले आहे. आणखी सोने आणण्यासाठी व तसेच कार घेण्यासाठी माहेरून पाच लाख रूपये घेऊन ये म्हणत पत्नीचा छळ केला. शिवाय फिर्यादींना उपाशी ठेवून शारीरिक व मानसिक जाचहाट केले, अशा आशयाची फिर्याद नेहा वास्टर यांनी दिली आहे. या फिर्यादीवरून वरील चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
 

Web Title: Case against four people including husband for starving wife for car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.