दुकाने बंद केल्या प्रकरणी ओमी टीमच्या १६ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 08:14 PM2020-07-02T20:14:27+5:302020-07-02T20:17:57+5:30
ओमी टीम सह व्यापारी संघटनेने सेल्फ डाउनचे आवाहन व्यापाऱ्यांना केले होते.
उल्हास नगर : नेहरु ते शिरू चौक रस्त्यावरील बेकायदेशीररीत्या दुकानें बंद केल्याप्रकरणी ओमी टीमच्या १६ जनावर उल्हासनगरपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ओमी टीम सह व्यापारी संघटनेने सेल्फ डाउनचे आवाहन व्यापाऱ्यांना केले होते.
उल्हासनगर महापालिका आयुक्तांनी लॉकडाऊन जाहीर करण्यापू्वी ओमी टीम व यूटीए व्यापारी संघटनेने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व्यापाऱ्यांना सेल्फ डाउन करण्याचे आवाहन केले होते. मात्र आवाहन करूनही दुकानें सुरु होती. अखेर बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान ओमी टीमच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून नेहरु ते शिरू चौक दरम्यानची दुकाने बंद करायला लावली. बेकायदेशीररित्या दुकाने बंद केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवून ओमी टीमचे कमलेश निकम, संतोष पांडे, नरेश गायकवाड, दिपू निषाद, शिवाजी रगडे, सनी तेलकर, पियूष वाघेला, बोजा चेट्वानी यांच्यासह १६ जनावर उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ओमी टीम व यूटीए व्यापारी संघटनेच्या सेल्फ डाउनचे आवाहन व्यापाऱ्यांनी फेटाळल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
आधी गळा आवळला, मग पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवलं डोक, चिमुकल्याच्या हत्येने मुंबईत खळबळ
नियमांचे उल्लंघन: २०२ दुचाकींसह २४५ वाहने वाहतूक शाखेने केली जप्त
पत्नीच्या हत्येप्रकरणी जामिनावर; आमदार अमनमणि त्रिपाठींनी केले दुसरे लग्न
लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल
Sushant Singh Rajput Suicide : तपासाला वेग, आत्महत्येवेळी घरात सिद्धार्थ देखील होता उपस्थित
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भन्साळींना 'समन्स', बॉलिवूड विश्वात खळबळ