चंदा कोचर, वेणुगोपाल धूत यांच्या निवास्थानी ईडी घेणार झडती   

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 04:06 PM2019-03-01T16:06:38+5:302019-03-01T16:07:50+5:30

कोचर यांनी तब्बल ३ हजार २५० कोटींचे कर्ज व्हिडिओकॉन समुहाला दिले आणि त्यातील काही पैसे त्याच्या पतीला देण्यात आले होते, असा त्यांच्यावर ठपका आहे.  

Chanda Kochhar, Venugopal Dhoot's search for the eduction | चंदा कोचर, वेणुगोपाल धूत यांच्या निवास्थानी ईडी घेणार झडती   

चंदा कोचर, वेणुगोपाल धूत यांच्या निवास्थानी ईडी घेणार झडती   

Next
ठळक मुद्देआज कोचर यांच्या मुंबईच्या घरावर तपास होणार आहे.आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज घेणारे वेणुगोपाल धूत यांच्याही औरंगाबाद येथील घराची झडती घेतली जाणार आहे.   

मुंबई - गैरव्यवहार करून कर्ज दिल्या प्रकरणावरून आयसीआयसीआय बँकेच्या माजी अध्यक्ष चंदा कोचर आणि व्हिडिओकॉन समुहाचे वेणुगोपाल धूत यांच्या निवासस्थानांवर अंमलबाजवणी संचालनालय (ईडी) आज तपास करणार आहे. मागील महिन्यात यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. कोचर यांनी तब्बल ३ हजार २५० कोटींचे कर्ज व्हिडिओकॉन समुहाला दिले आणि त्यातील काही पैसे त्याच्या पतीला देण्यात आले होते, असा त्यांच्यावर ठपका आहे.  

चंदा कोचर यांचे हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर त्यांना मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पदाचा राजीनामा द्यावा लागला. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मागच्याच महिन्यात त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून घेतला होता. त्यानंतर आज कोचर यांच्या मुंबईच्या घरावर तपास होणार आहे. तसेच आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज घेणारे वेणुगोपाल धूत यांच्याही औरंगाबाद येथील घराची झडती घेतली जाणार आहे.   

Web Title: Chanda Kochhar, Venugopal Dhoot's search for the eduction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.