ठळक मुद्देआर्थिक गुन्हे शाखेच्या (ईओडब्ल्यू) पथकाने आज 28 हजार 336 पानांचे आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणी 2014 मध्ये सात आरोपींविरोधात तीन आरोपपत्र दाखल करण्यात आली होती. 63 आरोपींविरोधात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
मुंबई - नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेड (एनएसईएल) घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या (ईओडब्ल्यू) पथकाने आज 28 हजार 336 पानांचे आरोपपत्र दाखल केले. साडेपाच हजार कोटी रुपयांच्या या घोटाळ्याप्रकरणी 63 आरोपींविरोधात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रात राज्य सरकारने नेमलेल्या फॉरेन्सिक ऑडिट व डिजिटल फॉरेन्सिक ऑडिट तज्ज्ञांनी सादर केलेला अहवाल, 520 साक्षीदारांचे जबाब, 509 बॅंक खात्यांची माहिती आणि 22 जीबी सॉफ्ट डेटा यांचा समावेश आहे. या प्रकरणी 2014 मध्ये सात आरोपींविरोधात तीन आरोपपत्र दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आले आहे.