शेतात ट्रॅक्टर घातल्याचा वाद, परस्पर विरुद्ध तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 02:49 AM2019-03-19T02:49:26+5:302019-03-19T02:49:47+5:30

कोथुर्णे गावामध्ये शेतात ट्रॅक्टर का घातला, असा जाब विचारल्यानंतर झालेल्या दोन गटातील वादावादीतून कामशेत पोलीस ठाण्यात परस्परविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Complaint against the field of tractor insertion, complaint against each other | शेतात ट्रॅक्टर घातल्याचा वाद, परस्पर विरुद्ध तक्रार दाखल

शेतात ट्रॅक्टर घातल्याचा वाद, परस्पर विरुद्ध तक्रार दाखल

Next

कामशेत - कोथुर्णे गावामध्ये शेतात ट्रॅक्टर का घातला, असा जाब विचारल्यानंतर झालेल्या दोन गटातील वादावादीतून कामशेत पोलीस ठाण्यात परस्परविरोधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी प्रमोद ज्ञानेश्वर दळवी (वय ३०, रा. कोथुर्णे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून बाळू गोविंद दळवी, कृष्णा
गोपाळ दळवी, गोपाळ नारायण दळवी, लक्ष्मी गोपाळ दळवी, भरती कृष्णा दळवी, सुजाता बाळू दळवी (सर्व रा. कोथुर्णे, ता. मावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याच प्रकरणी दुसऱ्या गटातील बाळासाहेब गोविंद दळवी (वय ३६, रा. कोथुर्णे, ता. मावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुषार ज्ञानेश्वर दळवी, प्रमोद ज्ञानेश्वर दळवी, शैला ज्ञानेश्वर दळवी, ज्ञानेश्वर पांडुरंग दळवी व इतर अज्ञात ८ ते १० व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

संध्याकाळी फिर्यादी बाळासाहेब दळवी घरी आल्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वर दळवी यांना फोन केला असता, त्यांनीही फोनवरून शिवीगाळ केली. रविवारी (दि. १७) रात्री नऊच्या सुमारास बाळासाहेब दळवी यांच्या घरात अचानक आलेल्या तुषार ज्ञानेश्वर दळवी, प्रमोद ज्ञानेश्वर दळवी, शैला ज्ञानेश्वर दळवी, ज्ञानेश्वर पांडुरंग दळवी व इतर अज्ञात ८ ते १० जणांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या वेळी तुषार दळवी यांनी डोक्यात दांडक्याने मारल्याने बाळासाहेब दळवी खाली पडले व त्यांच्या हाता-पायावर प्रमोद दळवी यांनी दांडक्याने मारहाण केली.

याचप्रकरणी प्रमोद ज्ञानेश्वर दळवी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. १७) रात्री साडेदहाच्या सुमारास घरात घुसलेल्या बाळू गोविंद दळवी, कृष्णा गोपाळ दळवी, गोपाळ नारायण दळवी, लक्ष्मी गोपाळ दळवी, भरती कृष्णा दळवी, सुजाता बाळू दळवी यांनी तुषार दळवी कुठे आहे, अशी विचारणा करत घरातील ज्ञानेश्वर दळवी, शैलजा दळवी व प्रमोद दळवी यांना धक्काबुक्की करत दांडक्याने मारहाण केली. याप्रकरणी पुढील तपास कामशेत पोलीस ठाण्याचे प्रमुख विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार महेंद्र वाळुंजकर करीत आहेत.

कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी ( दि. १७ ) बाळासाहेब गोविंद दळवी यांच्या मालकीचा ट्रॅक्टर (एमएच १४ डीएच १३२) हा कल्पना संतोष दळवी यांच्या सांगण्यावरून कृष्णा दळवी हे सुमारे ८-१० दिवसांपूर्वी शेतात घालून रोटरणी करत होते. त्यांचे चुलत सासरे ज्ञानेश्वर पांडुरंग दळवी यांचा फोन बाळासाहेब गोविंद दळवी यांना आला व त्यात ते म्हणाले, ‘माझ्या शेतात तुमचा ट्रॅक्टर चालू आहे तो बंद करा.’ त्यानंतर शनिवारी (दि. १६) दुपारी तुषार ज्ञानेश्वर दळवी व शैला ज्ञानेश्वर दळवी हे घरी येऊन कृष्णा दळवीला शेतात ट्रॅक्टर घातला म्हणून जाब विचारुन मारहाण केली.

Web Title: Complaint against the field of tractor insertion, complaint against each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.