युनायटेड फॉस्फरस लि.प्रकरणी खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 09:27 PM2019-04-16T21:27:48+5:302019-04-16T21:32:56+5:30
न्यायालयाला विचारून त्याचा तपास करण्याची परवानगी घेण्यात आली असून पुढील चौकशी सुरू करण्यात आल्याचे खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.
मुंबई - युनायटेड फॉस्फरस लिमिटेड प्रकरणात अदखलपात्र (एनसी) स्वरूपाच्या गुन्हायाची नोंद खार पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. न्यायालयाला विचारून त्याचा तपास करण्याची परवानगी घेण्यात आली असून पुढील चौकशी सुरू करण्यात आल्याचे खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.
तक्रारदार संजय म्हात्रे (दुय्यम अभियंता) हे लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी वांद्रे पश्चिम विभागात भरारी पथकाचे प्रमुख म्हणून काम करत आहेत. त्यांच्या पथकाला निवडणूक आचारसंहिता व खर्च विषय नियमाचा भंग झाल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती. त्यानंतर त्याची शहनिशा करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देत खार पोलीस ठाण्यात एनसी दाखल करण्यात आली. ९ एप्रिल रोजी प्रदेश काँग्रेस प्रवक्ता सचिन सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार खार येथील मधुपर्क, युनिफोर्स हाऊस येथे आचारसंहिता लागू असतानाही भाजपाच्या प्रचारासाठी अंदाजे ४०० घडी पत्रिका असलेला एक बॉक्स असे ऐकून ३९ बॉक्स घडी पत्रिका तयार केल्या होत्या. या पत्रिका उघडल्यानंतर ध्ननिफीत वाजविण्यात येते. त्यासाठी मीडिया सर्टिफिकेट अँडमॉनिटरिंग कमिटी यांच्याकडून मान्यता न घेता प्रचाराचे हे साहित्य तयार करत असल्याने लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार कलम १२७ (अ) अन्वये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
युनायटेड फॉस्फरस लि. आणि भाजपचे घनिष्ठ संबंध, सचिन सावंत यांचा आरोप