४४ लाखांच्या शिष्यवृत्ती घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन प्राचार्य अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 04:31 PM2019-02-19T16:31:56+5:302019-02-19T16:34:14+5:30

ईओडब्ल्यूची कारवाई : फुलवंताबाई इन्स्टिट्यूट आॅफ कम्प्यूटर अँड इन्फर्मेशन प्रकरण 

In connection with the 44 lakh scholarship scam principal arrested | ४४ लाखांच्या शिष्यवृत्ती घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन प्राचार्य अटकेत

४४ लाखांच्या शिष्यवृत्ती घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन प्राचार्य अटकेत

Next
ठळक मुद्दे वर्धा येथील नालवाडी स्थित आश्रय बहुउद्देशीय संस्थेच्या अमरावती येथील फुलवंताबाई इन्स्टिट्यूट आॅफ कम्प्यूटर अँड इन्फर्मेशनचे हे प्रकरण आहे. विशेष म्हणजे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शिष्यवृत्ती घोटाळे उघड झाले आहेत.विद्यार्थ्यांनी गाडगेनगर पोलिसात तक्रार नोंदविली.

अमरावती - ४४ लाख ४८ हजार ९० रुपयांच्या शिष्यवृत्ती घोटाळ्यातील आरोपी असलेल्या तत्कालीन प्राचार्यास आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी अटक केली. वर्धा येथील नालवाडी स्थित आश्रय बहुउद्देशीय संस्थेच्या अमरावती येथील फुलवंताबाई इन्स्टिट्यूट आॅफ कम्प्यूटर अँड इन्फर्मेशनचे हे प्रकरण आहे. विशेष म्हणजे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शिष्यवृत्ती घोटाळे उघड झाले आहेत.

पोलीस सूत्रानुसार, दीपाली अशोक चव्हाण (रा. नवसारी) या विद्यार्थिनीने २४ एप्रिल २०१८ रोजी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. फुलवंताबाई इन्स्टिट्यूट आॅफ कम्प्यूटर अँड इन्फर्मेशनमध्ये सन २०११-१२ मध्ये १११ विद्यार्थ्यांनी डिप्लोमा इन वेब डिझायनिंग व डिप्लोमा इन ग्राफिक्स अँड अ‍ॅनिमेशन या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेतला होता. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाकडून शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. प्रतिविद्यार्थी ३९ हजार ९०० रुपयाप्रमाणे शासनाकडून ही शिष्यवृत्ती देण्यात आली. या सर्व विद्यार्थ्यांची ४४ लाख ४८ हजार ९० रुपयांची शिष्यवृत्ती संस्थेच्या बँक खात्यात शासनाकडून जमा करण्यात आली. या शिष्यवृत्तीतून विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, निर्वाह भत्तासह अन्य सुविधा महाविद्यालयाकडून मिळणार होत्या. मात्र, महाविद्यालयाकडून एकाही विद्यार्थ्याला शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला नाही. संस्थेने एक वर्षाचे प्रशिक्षण एक ते दीड महिन्यातच उरकविले. त्यांना प्रमाणपत्रही दिले नाही.  विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्तीसुद्धा जमा केली नाही. हा घोळ लक्षात येताच विद्यार्थ्यांनी लढा उभारला. 

विद्यार्थ्यांनी गाडगेनगर पोलिसात तक्रार नोंदविली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भा.दं.वि.कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्यानंतर तपासकार्य सुरू झाले. पोलिसांनी मेळघाटातील धारणी, चिखलदरा व अन्य ठिकाणच्या आदिवासी विद्यार्थ्यांकडून माहिती घेऊन त्यांची चौकशी केली. यादरम्यान प्रकरणातील आरोपी असलेला संस्थेचा प्रभारी कोषाध्यक्ष व अध्यक्ष अमोल अजय श्रीवास्तव याने न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविला. महाविद्यालयाच्या तत्कालीन प्राचार्याला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. यातील आणखी एक आरोपी लिपिक असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंजाब वंजारी यांनी दिली. पोलिसांनी अटक केलेल्या प्राचार्याचे नाव गोपनीय ठेवले आहे.

Web Title: In connection with the 44 lakh scholarship scam principal arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.