कल्याण - कल्याण गुन्हे शाखेने आज दुपारी 1 ते 2 वाजताच्या दरम्यान मानपाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार शिवाजी किसन कालन (25) याला मानपाडा पोलीस ठाण्याने एक वर्षाकरिता तडीपार केलेले असताना तो आपल्या घरी आलेला आहे अशी गुप्त बातमीदारामार्फत बातमी कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना मिळाली होती. त्याप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पोलीस उप निरीक्षक निलेश पाटील, पोलीस उप निरीक्षक नितीन मुदगुन, पोलीस हवालदार दत्ताराम भोसले, राजेंद्र खिलारे राजेंद्र घोलप, निवृत्ती थेरे आणि हरिश्चंद्र बंगारा यांच्या पथकाने आरोपी त्याचे घराला चारी बाजूने घेराव घालून अटक केली.
कालन हा आरोपी हेदुटणे गाव बदलापूर पाईप लाईन रोड मानपाडा डोंबिवली पूर्व येथे राहायचा. याच पत्त्यावर आरोपी शिवाजी किसन कालन आला असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस आपल्या घरी येणार असल्याचा सुगावा लागताच कालन आपल्या घराच्या मागील बाजूच्या खिडकीतून उडी मारून पोलिसांना चकवा देऊन त्याच्या घराच्या मागे शेतजमीन आणि जंगलात पळत असताना पोलिसांनी थरारक पाठलाग करून करून पकडले. या आरोपी त्याच्यावर मानपाडा पोलीस ठाण्याच्या अभिलेखावर नागरिकांवर दहशत निर्माण करणे चाकू, तलवार वापरणे वार करणे, धमकावणे तसेच नागरिकांना लुटणे (रॉबरी) असे एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. या आरोपीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 अन्वये कारवाई करून मानपाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं आहे.