देशासह राज्यात कोरोना व्हायरसने (Coronavirus) चांगलंच थैमान घातलं आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत रूग्णांची संख्या भीतीदायक आहे. मात्र, अनेकांना सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे त्यांनी घरीच उपचार घेण्याचा आणि विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला जात आहे. अशात बीडच्या(Beed) केज तालुक्यातून एका कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाने केलेला एक धक्कादायक प्रकार (Crime News) समोर आला आहे.
lokmat.news18.com ने दिलेल्या वृत्तानुसार, होम क्वारंटाइन असलेला एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नांगरणीच्या वादातून आपल्या चुलत भावावर थुंकला (corona infected patient spit on cousin's body) आहे. ही धक्कादायक घटना बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील सारुकवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. (हे पण वाचा : अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनंच काढला काटा; दोन बायका असलेल्या पतीची हत्या)
येथील रहिवासी असलेले सुभाष फुंदे आणि त्याची आई कुसुम फुंदे दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्याची लक्षणे सौम्य असल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सुभाष फुंदेचा चुलत भाऊ दीपक फुंदे आणि त्याचे चुलते श्रीराम फुंदे शेतात काम करत होते. तसेच सुभाष शेतात नांगरणी करत होता.
यावेळी चुलत भाऊ दीपक “तू आमच्या मालकीचं शेत नांगरु नको, तुझ्याच शेताची नांगरणी कर’, असं म्हणाला. यावरून दोघांत वादाला सुरुवात झाली. यानंतर संतापलेल्या कोरोनाबाधित सुभाषनं आपल्या तोंडाचा मास्क काढून चुलत भाऊ दीपकच्या अंगावर थुंकला. त्यानंतर दोन्ही परिवारात मारमारी झाली.
याप्रकरणी श्रीराम फुंदे यांनी केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पीडित श्रीराम फुंदे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी बळीराम फुंदे, सुभाष फुंदे, कुसुम फुंदे आणि उषा फुंदे या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक अमोल गायकवाड करत आहेत.