coronavirus: कोरोना संशयित मृताचे दागिने रुग्णालयातून गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 02:54 AM2020-09-04T02:54:53+5:302020-09-04T02:56:10+5:30
रुग्णालय प्रशासनाने त्या महिलेच्या कानांतील कर्णफुले व पायांतील जोडवी काढून नातेवाइकांकडे दिली; पण त्यांच्या गळ्यात सोन्याचे मंगळसूत्र व दोन्हीही हातांत एकूण दोन सोन्याच्या पाटल्या होत्या.
कोल्हापूर : कोरोनाग्रस्त मृत महिलेच्या हातातील सुमारे एक लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या पाटल्या रुग्णालयातून अज्ञाताने चोरल्याचा प्रकार घडला. कोल्हापुरातील एका नामवंत रुग्णालयामध्ये हा प्रकार घडला.
सखुबाई नेजकर-कांबळे (वय ६५) यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने कोरोना संशयावरून उपचारासाठी दाखल केले. रुग्णालय प्रशासनाने त्या महिलेच्या कानांतील कर्णफुले व पायांतील जोडवी काढून नातेवाइकांकडे दिली; पण त्यांच्या गळ्यात सोन्याचे मंगळसूत्र व दोन्हीही हातांत एकूण दोन सोन्याच्या पाटल्या होत्या. आॅक्सिजन लावल्याने तसेच हाताला सलाईन असल्याने ते दागिने नंतर देऊ असे रुग्णालयाच्या प्रशासनाने सांगितल्याचे नातेवाइकांनी सांगितले. पण दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता त्यांचा मृत्यू झाला. पण सोन्याच्या पाटल्यांबाबत रुग्णालयाच्या प्रशासनाला वारंवार विचारूनही नंतर त्यांनी टाळाटाळ केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. मृताचा मुलगा शीतल मलगोंडा नेजकर यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.