दिल्लीत लॉकडाऊनमुळे लोकांना घरातच राहण्याची सूचना देण्यात येत आहे, तर दुसरीकडे संभाव्य कोरोनाबाधिताला सुद्धा अलग ठेवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत सरकारचे सर्व नियम व कायदे माहित असलेल्या पोलिस कर्मचार्यांनी अशी चूक केल्यास आपण काय म्हणाल? अशीच एक घटना दिल्लीतील पाश्चिम विहार वेस्ट पोलिस स्टेशन परिसरातून समोर आली आहे. जेथे दिल्ली पोलिसांच्या एका महिला हेडकॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Coronavirus Lockdown : मास्क न घातल्याने सीआरपीएफ जवानाला मारहाण, पोलिसांचे केले निलंबन
खळबळजनक! मुलांचा गळा आवळून पतीने दोन पत्नींसह राहत्या इमारतीतून मारली उडी
असा आरोप आहे की, महिला हेड कॉन्स्टेबलला घरात अलग ठेवण्यात आले होते, परंतु ती कायद्याचे उल्लंघन करत घराबाहेर पडली. इतकेच नाही तर ती दिल्लीच्या बाहेर आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीरागढ़ी परिसरात राहणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या एका महिला हेड कॉन्स्टेबलला होम कोरॅन्टाईनमध्ये राहण्याचे आदेश दिले होते.दरम्यान, काही पोलिस कर्मचारी त्याच्या घरी तपासणीसाठी गेले. मात्र, घरात महिला सापडली नाही. अशा परिस्थितीत पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली, त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या महिला हेड कॉन्स्टेबलच्या फोनवर पाळत ठेवण्यात आला. मोबाईल ट्रेस करून फोनची लोकेशन 4 दिवसांपासून दिल्लीत सापडली नाही, तर हरियाणाच्या गुडगाव भागात आढळली. यानंतर, पश्चिम विहार वेस्ट पोलिस ठाण्यात या प्रकरणाची गंभीर दखल घेत दिल्ली पोलिसांच्या महिला हेड कॉन्स्टेबलविरोधात भा. दं. वि. कलम १८८ / २६९/ /२७० आणि ३, महामारी कलम ५१ बी आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.