Coronavirus Lockdown : मास्क न घातल्याने सीआरपीएफ जवानाला मारहाण, पोलिसाचे केले निलंबन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 07:07 PM2020-04-30T19:07:46+5:302020-04-30T19:12:48+5:30
निमलष्करी दलांनी राज्यातील पोलीस प्रमुखांसमवेत हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे.
कर्नाटकातील बेलागावी जिल्ह्यात लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सीआरपीएफच्या जवानाशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून पोलिस उपनिरीक्षकास निलंबित करण्यात आले आहे. निमलष्करी दलांनी राज्यातील पोलीस प्रमुखांसमवेत हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे.
गुरुवारी पोलिसांनी सांगितले की, एक्जामबा गावात कोब्रा कमांडो सचिन सावंत याच्या अटकेसंदर्भातील प्रकरण योग्यप्रकारे न हाताळल्याबद्दल सदलगा पोलीस स्टेशनशी संबंधित अनिल कुमारला निलंबित करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआरपीएफ जवान मास्क न घालता आपल्या मित्रासोबत बसला होता. यावेळी पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिस पथकाने लॉकडाऊनचे नियम मोडल्याप्रकरणी सीआरपीएफच्या जवानाने पोलिस पथकासह वादविवाद केला. यादरम्यान त्याने पोलिस पथकावरही हल्ला केला, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
CoronaVirus वडिलांच्या आजारपणाचा बनाव रचत अॅम्बुलन्सने दिल्लीला गेला; लग्न करूनच परतला
coronavirus : संभाव्य कोरोनाबाधिताने आयसोलेशन वॉर्डमधून उडी मारून केली आत्महत्या
प्रेमसंबंध अमान्य असल्याने कुटुंबीयांनी मुलीची गळा आवळून केली हत्या
एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात सावंत यांना कॉन्स्टेबलने मारहाण केली व अनवाणी फिरवले. सदलगा स्थानकात सीआरपीएफ जवान साखळदंडात बांधल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यानंतर सीआरपीएफचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय अरोरा यांनी कर्नाटक डीजीपी यांना पत्र लिहिले. यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली.
पोलिस महानिरीक्षक राघवेंद्र सुहास यांनी पत्रकारांना सांगितले की, "प्रकरण योग्यप्रकारे न हाताळल्याबद्दल आम्ही त्या पोलिस स्टेशनच्या उपनिरीक्षकांना निलंबित केले आहे. निलंबित पोलीस अधिकारी हे पोलिस स्टेशनचा प्रभारी आहे आणि तेथे जे काही घडते त्यांची जबाबदारी आहे."
सावंत यांना अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता, सुरुवातीला त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. परंतु नंतर मंगळवारी सशर्त जामीन मंजूर केला.