नाशिक : कोरोनाच्या संक्र मणकाळात लॉकडाऊन सुरू असताना जनसामान्यांपर्यंत अधिकृत शासकीय माहितीची कुठलीही खात्री व पडताळणी न करता दिशाभूल करणारी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करणे ३१ ‘नेटिझन्स’ला चांगलेच भोवले आहे. त्यांच्यावर पोलिसांकडून थेट फौजदारी गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे.लॉकडाऊन काळात कधी मनपा आयुक्तांच्या नावाने, तर कधी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने चुकीची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करून व्हायरल केली गेली होती. बेभानपणे व अतिउत्साहात कुठल्याही माहितीची खातरजमा न करता थेट समाजमाध्यमातील फेसबुक, व्हॉस्टअॅप, टिष्ट्वटरसारख्या सोशल साइट्सवर पोस्ट करणे काही नेटिझन्सला महागात पडले. ग्रामीण सायबर पोलिसांनी विविध पोलीस ठाणे अंतर्गत अशाप्रकारच्या २० लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करत ३७ संशयितांना अटकदेखील केली.तसेच नाशिक शहरसायबर पोलिसांनी ११ संशयितांवर अद्याप अशाप्रकारे कारवाईकेली आहे. यामध्ये एकूण ८ पुरुषव १ महिलेला अटकदेखीलकरण्यात आली.
coronavirus: कोरोनाच्या आक्षेपार्ह पोस्ट टाकणे नेटिझन्सला भोवले, नाशिकला ३१ जणांवर गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 6:20 AM