सचिन सागरे
कल्याण : कल्याण डोंबिवलीत एकीकडे कोरोनाचा होटस्पॉट बनला आहे. दुसरीकडे डोंबिवली एमआयडीसीमध्ये काम करणारे 231 कामगार पायी चालत यूपी आणि बिहारला जात असताना कल्याणच्या पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.लोकडाऊन काळात डोंबिवली एमआयडीसी बंद आहे. कामगार घरी बसले आहे. डोंबिवली ग्रामीण भागात गोळवली, दावडी, टाटा पावर भागात राहणारे 231 मजूर रात्री तीन वाजन्याच्या सुमारास यूपी आणि बिहार ला जाण्यासाठी निघाले. कल्याणच्या पोलिसांनी या सर्व मजुरांना कल्यान पश्चिम दुर्गाडी चौकात ताब्यात घेतले. कल्याणच्या सुभाष मैदानात केडीएमसीच्या आरोग्य विभागाकडून त्यांची तपासणी सुरू आहे. या मजुरांची रवानगी क्वारंटाईन कक्षात होऊ शकते, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात हे मजूर कसे जमा झाले. त्यांच्या मागे कुणी सूत्रधार आहेत का याचा तपास पोलीस करणार आहेत. दरम्यान, हातात पैसे नाही त्यामुळे जेवणाची भ्रांत झाली आहे म्हणून गावी निघाल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.