Coronavirus : अफवा पसरविणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांनी घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 06:41 PM2020-03-16T18:41:41+5:302020-03-16T18:44:03+5:30
Coronavirus : युट्युबवर कोरोना व्हायरस कुक्कुट उत्पादनांमुळे होतो अशी अफवा पसरविणाऱ्या उत्तर प्रदेशातील विधी संघर्ष बालक आणि आंध्रप्रदेशातील मोहम्मद अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई - सोशल मीडियावरून कोंबड्यांमुळे कोरोनाच्या विषाणूंचा प्रादुर्भाव होतो अशा आशयाचे अफवा पसरवणारे व्हिडीओ वायरल करणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्याने ताब्यात घेतले आहे. युट्युबवर कोरोना व्हायरस कुक्कुट उत्पादनांमुळे होतो अशी अफवा पसरविणाऱ्या उत्तर प्रदेशातील विधी संघर्ष बालक आणि आंध्रप्रदेशातील मोहम्मद अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
फेसबुक, व्हॉट्स अॅप आणि युट्युब यावर आपल्या देशात आणि राज्यात कुक्कुट मास आणि इतर कुक्कुट उत्पादने यांच्या आहारातील समावेशाबाबत अनेक अफवा पसविल्या जात आहेत. त्यामुळे कुक्कुट खाद्यनिर्मिती आणि कुक्कुट पालनावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. कुक्कुट उत्पादनामुळे कोरोना व्हायरस मानवी आरोग्यास धोका पोहचू शकतो अशी अफवा पसरवली जात असल्याची माहिती पुण्यातील महाराष्ट्र शासनाचे पशु संवर्धन आयुक्तालय यांनी दिली. तसेच सायबर पोलीस ठाण्यात याबाबत अर्ज दाखल करण्यात आला. त्यानुसार सायबर पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ५०५, १ (ब) अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर गुन्ह्यात न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५५ (२) अन्वये गुन्ह्याचा तपास करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार गुन्ह्याचा पुढील तपास सतबीर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी केला. या तपासात युट्युबमध्ये अफवा पसविणाऱ्यांची माहिती काढण्यात आली. तसेच युट्युबवरील अफवा पसरवणारे व्हिडीओ दिलीत करण्यात आले आहेत. त्यातील एक व्हिडीओ उत्तर प्रदेशातील बाभानवली बुजुर्ग येथील एकामहीलेच्या मोबाईल क्रमांकावरून अपलोड केल्याची निष्पन्न झाले. त्यानंतर सायबर पोलिसांनी एक पथक उत्तर प्रदेशात पाठविले. या पथकाने महिलेची चौकशी केली असता व्हिडीओ अपलोड करण्यासाठी वापरण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकाचे सिमकार्ड तिने जवळच्याच गावात राहणाऱ्या तिच्या बहिणीच्या मुलास दिल्याचे आणि तोच वापरत असल्याचे तपासत उघडकीस आले.
मुलाचा शोध घेतला असता तो मुलगा १६ वर्षाचा असल्याचे उघड झाले. तो वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. त्याने त्याच्या मावशीच्या मोबाईल क्रमांकाद्वारे टिकटॉक, फेसबुकवर अकाउंट उघडले आणि वयाची खोटी माहिती देऊन स्वतःच्या ईमेल आयडी देखील उघडला. त्याने युट्युबवर पाहून युट्युब चॅनेल सुरु केला. त्यावर त्याने ६० पेक्षा अधिक व्हिडीओ अपलोड केले. १ महिन्यापूर्वी कोरोना व्हायरसची लग्न कोंबड्यांमुळे होते असा व्हिडीओ त्याला मिळाला होता आणि तो खरा आहे की खोटा याची शहनिशा न करता त्याने व्हिडीओ युट्युबवर अपलोड केला होता. तसंच दुसरा व्हिडीओ आंध्र प्रदेशातील शहाशेब येथे राहणाऱ्या मोहम्मद अब्दुल सत्तारने अपलोड केला होता. सायबर पोलिसांच्या दुसरे पथक आंध्रप्रदेशात पाठविण्यात आले होते. या पथकाने सत्तारला अष्टक केली. सत्तारचे घड्याळ दुरुस्तीचे दुकान असून त्याचा स्वतःचा AL QURAN SAYING हा युट्युब चॅनल आहे. या चॅनेल आतापर्यंत ८० पेक्षा जास्त व्हिडीओ अपलोड केले आहेत. कोंबड्यांमुळे कोरोना होता असा व्हिडीओ खात्री न करता सत्तारने त्याच्या युट्युब चॅनेलवर अप्लोड केला. म्हणून त्याला अटक करण्यात आली.
Ravindra Shisve, Joint Commissioner of Pune Police: Based on complaint of Divisional Commissioner of Pune region a case has been registered with Koregaon police police station against one person for spreading fake message about #Coronavirus. pic.twitter.com/TCuryjj1i9
— ANI (@ANI) March 16, 2020