Coronavirus : दिलासादायक! उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीजवळ तैनात १७० सुरक्षा रक्षकांचे अहवाल निगेटीव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 08:08 PM2020-04-10T20:08:01+5:302020-04-10T20:12:08+5:30
Coronavirus : शहरातील १५ पोलीस वसाहतींवर विशेष लक्ष
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरात एका चहावाल्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर तेथे तैनात १७० पोलीस सुरक्षा रक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. दिलासादायक म्हणजे या सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. या सर्व पोलिसांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या वांद्रे येथील मातोश्रीबाहेरील चहावाल्याला करोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली होती. सोमवारी हे वृत्तसमोर आल्यानंतर सुरक्षा यंत्रणांची धावपळ सुरु झाली. चहावाला राहत असलेल्या इमारतीमधील चार जणांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलेलं होते. मातोश्री परिसरात तैनात काही पोलीस सुरक्षारक्षक या चहावाल्याकडे चहा प्यायचे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तेथे तैनात १७० पोलीस अधिका-यांची व कर्मचा-यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. या सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले. मात्र, नियमानुसार या सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.
मुंबईतील तीन पोलिसांना कोरोनाची लागण झाल्यामुळे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना सतर्कतेचे आदेश देण्याता आले आहेत. यावेळी पोलीस वसाहतींकडे लक्ष देण्यात येत आहे. शहरातील १५ पोलीस वसाहतींवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. यातील 8 वसाहती या पोलिस कर्मचाऱ्यांच्या आहेत आणि ५5 वसाहती या पोलीस अधिका-यांच्या आहेत. यापैकी २ वसाहती पूर्ण सील केल्या आहेत. या १५ वसाहतींमध्ये एक दिवसाआड वैद्यकीय पथक जाऊन येथील अधिकारी - कर्मचा-यांच्या कुटुंबियांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.