कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कोरोना झाला आहे. या घटनेनंतर दाऊदचे सुरक्षारक्षक व इतर कर्मचारी यांना क्वारंटाईन करण्यात आले आहेत. दाऊदची पत्नी महजबीनही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. त्याला आणि त्याची पत्नी यांना कराचीच्या मिलिटरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पाकिस्तानच्या कराचीमध्ये कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. मात्र, पाकिस्तानकडून वारंवार या गोष्टीला नकार दिला जात आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार ही बातमी पूर्णपणे सत्य आहे आणि दाऊद आणि त्याची पत्नी यांना मिलिटरी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. दाऊद इब्राहिमला कोरोना हा बराच काळ पाकिस्तानात आपल्या कुटूंबासह लपून राहत होता. दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचा ठाम पुरावाही भारताने दिला आहे, असे असूनही पाकिस्तान हे मान्य करण्यास नकार देत आहे.
सार्वजनिक शौचालयात महिलांचे मोबाईलमध्ये व्हिडीओ काढणारा पोलिसांच्या ताब्यात
लोकांनी विचित्र अवस्थेत प्रियकर अन् प्रेयसीला पकडलं अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, दाऊद इब्राहिमच्या घरी आता कोरोना विषाणू दाखल झाला आहे. दाऊद इब्राहिम आणि त्याची पत्नी महजबीन यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत. दाऊद इब्राहिम आणि पत्नी महजबीन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्या घरात काम करणारे सर्व कर्मचारी यांना क्वारंटाईन केले आहेत, अशी माहिती न्यूज १८ ने दिली आहे. दाऊद इब्राहिम कोण आहे?कुख्यात गुंड दाऊद हा भारताचा सर्वात मोठा शत्रू आहे. दाऊद १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांचा मास्टरमाईंड आहे आणि तो अंडरवर्ल्ड डॉन आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबद्दल जगाला माहिती आहे. परंतु त्याच्या कुटुंबाबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. कारण त्याने कुटुंबाला नेहमीच लोकांच्या नजरेपासून दूर ठेवले. दाऊदच्या पत्नीचे नाव मेहजबीन उर्फ झुबिना जरीन आहे. दाऊद आणि झुबिना यांना चार मुले झाली. महरूख, माहरीन आणि मारिया या तीन मुली तर मोईन नावाचा एक मुलगा आहे.