नवी दिल्ली - राजस्थानच्या जयपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या विवाहितेवर पुजाऱ्याने बलात्कार केल्याची भयंकर घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जयपूरमधील चंदवाजी पोलिसांनी याप्रकरणी मंदिरातील पुजाऱ्याला 15 तासांत अटक केली आहे. जयपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शंकर दत्त शर्मा दिलेल्या माहितीनुसार, 18 ऑगस्ट रोजी 23 वर्षीय विवाहितेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, गावातील मंदिराचे पुजारी गोपाळ उर्फ मुकेश जांगिड यांनी बलात्कार केला असं म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी महिला आपले वडील आणि पतीसह भेरुची मंदिरात लग्नानंतर दर्शनासाठी गेली होती. येथे पुजाऱ्याने रात्री होम-हवन करण्याच्या बहाण्याने तिला थांबायला सांगितलं. यानंतर पुजाऱ्याने तिचे पती आणि वडिलांना चौकात काही कामासाठी पाठवलं. पुजाऱ्याने ती एकटी असल्याचा फायदा घेतला आणि साधारण पहाटे 3 वाजता नशेचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. सकाळी जाग आल्यानंतर पुजारी तिला नातेवाईकांसह आपल्या कारमधून तिच्या गावी सोडायला आला. तेथे पोहोचल्यानंतर पीडितेने आपल्यासोबत झालेला प्रकार सांगितला.
कुटुंबीय जेव्हा पुजाऱ्याला पकडण्यासाठी गेले, तेव्हा पुजारी कार सोडून घटनास्थळावरून फरार झाला होता. पीडितेने यानंतर पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी कार जप्त केली आहे. पुजाऱ्याला पकडण्यासाठी पोलिसांच्या टीमने अलवर जिल्ह्यातील नारायणपूर, जयपूर जिल्ह्यातील शाहपुरा अशा अनेक ठिकाणी बंदोबस्त वाढवला. शेवटी गुरुवारी सकाळी 10 वाजता पोलिसांनी फरार पुजाऱ्याला ताब्यात घेतलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विवाहित असून त्याला तीन मुली आणि एक मुलगा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
हाहाकार! काबुल विमानतळाच्या कुंपणावरून चिमुकल्यांना फेकताहेत महिला; जीव वाचवण्यासाठी धावपळ
अफगाणिस्तानात भयंकर परिस्थिती निर्माण झाली असून जीव वाचवण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. तालिबान्यांच्या भीतीमुळे नागरिक देश सोडण्यासाठी आटापिटा करताना दिसत आहेत. अशातच काबूल विमानतळावर अमेरिकी, ब्रिटनचे सैनिक आणि अफगाण नागरिकांना वेगवेगळं करण्यासाठी तारेचं कुंपण घालण्यात आलं आहे. परंतु देश सोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या काही अफगाणी महिला आपल्या लहान मुलांना तारेच्या कुंपणापलीकडे फेकताना दिसत आहेत. अशातच काही मुलं या कुंपणांमध्येच अडकून पडल्याचा रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे.