संतापजनक! जबरदस्तीने कारमध्ये बसवलं अन् विनयभंग केला; तरुणीचा काँग्रेस नेत्यावर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 09:22 AM2022-07-22T09:22:45+5:302022-07-22T09:23:56+5:30

Crime News : 21 वर्षीय तरुणीने आरोप केला आहे की, महाबीर मसानी यांनी शहरातील अभय सिंह चौकातून तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवले आणि तिचा विनयभंग केला.

Crime News rewari allegations against congress leader molesting girl by forcibly sitting in car | संतापजनक! जबरदस्तीने कारमध्ये बसवलं अन् विनयभंग केला; तरुणीचा काँग्रेस नेत्यावर गंभीर आरोप

संतापजनक! जबरदस्तीने कारमध्ये बसवलं अन् विनयभंग केला; तरुणीचा काँग्रेस नेत्यावर गंभीर आरोप

Next

नवी दिल्ली - देशातील महिलांवरील बलात्काराच्या, अत्याचाराच्या अनेक धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. एका काँग्रेस नेत्याने तरुणीला जबरदस्तीने कारमध्ये बसवत तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. हरियाणाच्या रेवाडीतील काँग्रेस नेते महाबीर मसानी यांच्यावर तरुणीसोबत छेडछाड केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, रेवाडी जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या 21 वर्षीय तरुणीने आरोप केला आहे की, महाबीर मसानी यांनी शहरातील अभय सिंह चौकातून तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवले आणि तिचा विनयभंग केला. तसेच जातीयवादी शब्द बोलून जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे तरुणीने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंग, जीवे मारण्याची धमकी आणि एससी-एसटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे

डीएसपी मोहम्मद जमाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. महाबीर मसानी हे काँग्रेस नेते आहेत. ज्यांनी स्वत:वरील आरोपांवर माध्यमांसमोर काहीही सांगितले नाही. मात्र, एका षड्यंत्राखाली त्यांच्यावर आरोप करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच पोलीस तपासात सत्य बाहेर येईल, असेही ते म्हणाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: Crime News rewari allegations against congress leader molesting girl by forcibly sitting in car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.