पुणे : बनावट मृत्यूपत्र तयार करणा-या तलाठ्यासह नऊ जणांविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात फसवणूकीसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शशिकांत धनाजी कोलते, संतोष धनाजी कोलते, हेमलता धनाजी कोलते, अशोकपाटील बुबा सोनवणे, विलासराव खंडेराव चौधरी, जयमाला अशोक सोनवणे, अनिता विलास चौधरी, संजय मारूत लगण आणि तलाठी भाऊसाहेब अशा नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी रक्ताचे नाते नसताना देखील एका महिलेच्या मृत्यूनंतर चार वर्षांनी बोगस मृत्यूपत्र तयार करून तलाठ्याशी हातमिळवणी केली. त्यानंतर दप्तरी नोंदी केल्या होत्या. ही मिळकत हडपण्याचा प्रयत्न केला होता. दत्तात्रय बबन खांदवे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार वडिलोपार्जित मिळकत हडप करण्यासाठी संबंधित आरोपी असलेले बांधकाम व्यावसायिक आणि इस्टेट एजंट यांनी प्रयत्न केले. बनावट कागदपत्रे, बनावट मृत्यूपूत्र शासनाची फसवणूक करण्यात आली. ही तक्रार नोंदविण्यासाठी फिर्यादीने अॅड. सतिश नायर यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेतली होती. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.के.खान यांनी गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश विमानतळ पोलिसांनी दिले होते. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बनावट मृत्युपत्र करणाऱ्या तलाठ्यासह नऊ जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 8:01 PM