सराईत गुन्हेगाराला गावठी पिस्तुलासह अटक; दहशतवादविरोधी पथक व नारायणगाव पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 05:19 PM2020-06-04T17:19:28+5:302020-06-04T17:19:52+5:30
एक गावठी पिस्तूल एक जिवंत काडतुस हस्तगत
नारायणगाव : निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथक (अळर) व नारायणगावपोलिस ठाणे यांनी संयुक्तरित्या कारवाई करत कावळ पिंपरी येथील सराईत गुंडाला गावठी पिस्तुलासह अटक केली.
पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्ष (अळर) चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते हे आपल्या पथकासह नारायणगाव परिसरात गस्त करत असताना दहशतवाद विरोधी कक्षाचे राजू पवार व किरण कुसाळकर यांना मिळालेल्या बातमीच्या आधारे सराईत गुंड रोहिदास बाबुराव पाबळे (वय ३७ रा.कावळ, पिंपरी ता. जुन्नर) यांच्याकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. दहशतवाद विरोधी कक्ष या पथकाने नारायणगाव ठाण्याच्या मदतीने कावळ पिंपरी येथे छापा टाकून पाबळे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल एक जिवंत काडतुस हस्तगत केले. पाबळे याने बेकायदेशीर, बिगरपरवाना शस्त्र बाळगले म्हणून नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाबळे याचेवर यापूर्वी खुनाचा प्रयत्न , मारहाण यासारखे गुन्हे दाखल आहेत .
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, जुन्नर उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती दीपाली खन्ना , स्थानिक गुन्हे शाखा विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील , दहशतवाद विरोधी कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू पवार , पोलीस नाईक विशाल भोरडे, किरण कुसाळकर , मोसिन शेख , नारायणगाव पोलीस ठाण्याचे योगेश गारगोटे, सचिन कोबल या पथकाने केली .