गोहत्येची माहिती देणाऱ्या महिला पत्रकारावर जमावाचा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 06:31 PM2020-12-02T18:31:14+5:302020-12-02T18:34:53+5:30
Crowd attack on a woman journalist : अवैधरीत्या होणाऱ्या गोहत्येबाबत माहिती देणाऱ्या महिला पत्रकारावर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
बंगळुरू - अवैधरीत्या होणाऱ्या गोहत्येबाबत माहिती देणाऱ्या महिला पत्रकारावर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कर्नाटकमधील हासन जिल्ह्यातील पेंशन मोहल्ल्यात घडली.
हासन जिल्ह्यातील पेंशन मोहल्ल्यात हसन बाबू आणि रहमान अवैधपणे चार कत्तलखाने चालवत होते. हे दोघेही जनावरांचे तस्कर आणि कुख्यात अपराधी आहेत. तसेच त्यांच्या अवैध कत्तलखान्यात सुमारे १०० जनावरे होती.
दरम्यान, ही महिला पत्रकार पशुप्रेमी आणि पोलीस अधिकाऱ्यांसह चार कत्तलखाने आमि पाच जनावरांच्या होर्डिंग स्पॉटवर जाण्याचा प्रयत्न करत होतो. त्यांनी जनावरांना वाचवण्यासाठी अवैध कत्तलखाने उघडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संबंधित महिला पत्रकाराजवळ संतप्त जमाव गोळा झाला. जमावाने महिला पत्रकारासोबत गैरवर्तन आणि छेडछाड केल्यासा आरोप करण्यात आला आहे. तसेच या जमावाने तिथून न गेल्यास गंभीर परिणाम भोगावे लागण्याची धमकी दिल्याचा दावाही करण्यात आला आहे.
दरम्यान, या पथकाला काही जनावरांना वाचवण्यात यश मिळाले. उर्वरित जनावरे हसन बाबू आणि रहमान यांनी लपवली. पोलिसांनी या प्रकरणी अरसीकेरे टाऊन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सुमारे तीन महिन्यांपूर्वी अरसीकेरे टाऊनमध्ये जनावरांच्या मृतदेहांचे शेकडो टन अवयव उघड्यावर फेकलेल्या अवस्थेत सापडले होते.