Video : पंजाब पोलिसांचे क्रौर्य, एसएचओने गरीब भाजी विक्रेत्याच्या टोपलीवर मारली लाथ, आणि....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 07:46 PM2021-05-06T19:46:27+5:302021-05-06T19:47:03+5:30

Cruelty of Punjab police : त्यांच्या जागी बलविंदर सिंग यांची ठाणे शहराचे एसएचओ म्हणून नियुक्त केले गेले आहे. नंतर डीजीपी दिनकर गुप्ता यांनी या कृत्यासाठी नवदीप सिंग यांना निलंबित केले.

Cruelty of Punjab police during Corona period, SHO kicked the basket of poor vegetable seller, and .... | Video : पंजाब पोलिसांचे क्रौर्य, एसएचओने गरीब भाजी विक्रेत्याच्या टोपलीवर मारली लाथ, आणि....

Video : पंजाब पोलिसांचे क्रौर्य, एसएचओने गरीब भाजी विक्रेत्याच्या टोपलीवर मारली लाथ, आणि....

Next
ठळक मुद्दे एसएचओ नवदीप सिंग बुधवारी सराई रोडवरील भाजीपाला फेरीवाल्याजवळ पोहोचले. तेथे त्याला एका गोष्टीचा इतका राग आला की, त्याने संतापाच्या भरात भाजीच्या टोपलीला लाथ मारून उडवून दिली.

फागवारा - कोरोना कालावधीत शासकीय सूचनांचे पालन करताना पंजाबपोलिसांचा क्रूर चेहरा समोर आला आहे. बुधवारी चर्चेत असलेले शहरातील पोलीस ठाण्याच्या एचएचओ नवदीप सिंग यांचा संताप इतका अनावर झाला की त्यांनी लाथा मारून सराई रोडवरील भाजी विक्रेत्याच्या भाजीपाल्याच्या टोपल्या पायाने तुडवून उलटून दिल्या. एसएचओच्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडालीच पण रोष देखील व्यक्त केला जात आहे. दरम्यान, कुणीतरी त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एसएसपी कंवरदीप कौर यांनी तातडीने कारवाई करत एसएचओ नवदीप सिंगची झाडाझडती घेतली. त्यांच्या जागी बलविंदर सिंग यांची ठाणे शहराचे एसएचओ म्हणून नियुक्त केले गेले आहे. नंतर डीजीपी दिनकर गुप्ता यांनी या कृत्यासाठी नवदीप सिंग यांना निलंबित केले.

एसएचओ नवदीप सिंग बुधवारी सराई रोडवरील भाजीपाला फेरीवाल्याजवळ पोहोचले. तेथे त्याला एका गोष्टीचा इतका राग आला की, त्याने संतापाच्या भरात भाजीच्या टोपलीला लाथ मारून उडवून दिली. हे पाहून तेथे उपस्थित लोक घाबरून गेले आणि पळून गेले. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ बनवून कोणीतरी व्हायरल केले, हा व्हिडीओ फागवारा येथे चर्चेचा विषय ठरला आहे.

एसएचओ नवदीप सिंह अनेकदा चर्चेत
नवदीप सिंह बर्‍याचदा कुठल्या ना कुठल्या गोष्टीबद्दल चर्चेत असतं. फागवारा येथे नवदीप सिंह संबंधित पोलीस ठाण्यात रुजू झाल्यानंतर चोरी व इतर गुन्हेगारीच्या अनेक घटना घडल्या आहेत, त्या पोलीस सोडवू शकले नाहीत. सरकारच्या निर्देशांचे पालन करण्याच्या नावाखाली सामान्य लोकांवर अत्याचार केल्याचा आरोप नवदीप सिंगवर आहे. आता आर्थिक दुर्बल भाजी विक्रेत्यासोबत एसएचओचे असे वागणे खाकीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे.

नियमांचे पालन केले पाहिजे परंतु तसे नाही
सामान्य लोक म्हणतात की, कोविड -१९ ची सतत वाढ होणे ही अत्यंत चिंतेची बाब आहे. सरकारी नियम आणि कायदा पाळणे देखील खूप महत्वाचे आहे. शासकीय आदेशांचे पालन करणे हे पोलिस प्रशासनाचेही कर्तव्य आहे, परंतु एखाद्या गरीब माणसाबरोबर पोलिसांचे असे वर्तन निंदनीय आहे. एखाद्या कमकुवत भाजी विक्रेत्याला अशा प्रकारे वागणूक देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कडक कारवाई केली जावी.



प्रभारी पीसीआरचीही बदली झाली
त्यांच्यासमवेत एसएचओ नवदीप सिंग यांच्या जागी पीसीआर प्रभारी बलजिंदर सिंग मल्ली यांची नेमणूक करण्यात आली. एसएसपी कंवरदीप कौर यांनी नवदीप सिंग तसेच बलजिंदर सिंग मल्ली यांची बदली केली आहे. 

एसएचओ नवदीप निलंबित, डीजीपी यांनी ट्विट केले
डीजीपी पंजाब दिनकर गुप्ता यांनी या प्रकरणाला लज्जास्पद आणि असह्य कृत्य म्हटले आहे. डीजीपी यांनी ट्विट केले की, पोलिस कोणत्याही किंमतीला असे वर्तन सहन करणार नाहीत. यासाठी एसएचओ नवदीप सिंग यांना तातडीने प्रभागातून निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये इतर कोणीही सामील झाल्याचे आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

 

 

Web Title: Cruelty of Punjab police during Corona period, SHO kicked the basket of poor vegetable seller, and ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.