अमानुषपणा! रिक्षाचालकाचे केस पकडून फरफटत आणलं, लोखंडी प्लेटवर डोकं आपटून मारहाण
By पूनम अपराज | Published: October 13, 2020 05:50 PM2020-10-13T17:50:32+5:302020-10-13T17:51:32+5:30
Brutally Assaulting : ही घटना रविवारी दुपारी 4.15 च्या सुमारास आधारल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
नवी दिल्ली - किरकोळ रस्त्यात झालेल्या अपघातानंतर रिक्षा चालकाला हिंसक पद्धतीने मारहाण करण्यात आली असून या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा उभा राहतो. या मारहाणीचा भीषण व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एवढेच नाही तर रिक्षाचालकाला वाचवण्यासाठी गेलेल्या लोकांनाही आरोपीने शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. सोमवारी या घटनेसंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याप्रकरणी पोलिसांनी चंदन सिंग आणि अभिषेक दुबे या दोन आरोपींना अटक केली आहे. मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये ही भीषण घटना घडली. ऑटो-रिक्षाने स्कूटरला धडक दिल्याने हा अमानुष मारहाणीचा प्रकार घडला. ही घटना रविवारी दुपारी 4.15 च्या सुमारास आधारल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
ऑटो रिक्षाचालकाला बेशुद्ध होईपर्यंत निर्घृणपणे मारहाण करण्यात आली. बेशुद्ध अवस्थेतत त्याला लोखंडी प्लेटनं मारहाण करण्यात आली. चालकाला उचलून उचलून फेकण्यात देखील आलं. यानंतर हल्लेखोरांनी चालकाला खेचत पोलीस स्टेशनपर्यंत घेऊन गेले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली. सोमवारी हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बहुगुणा यांनी हल्लेखोरांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. सध्या रिक्षाचालक अजित विश्वकर्मा याची प्रकृती गंभीर आहे.
आधारल पोलिसांनी सांगितले की, ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.१५ वाजता एक युवती आपल्या लहान बहिणीसह मोपेडवर बसून कुठेतरी जात होती. दुसऱ्या बाजूनं लोडिंग ऑटोने (एमपी -20 एलबी 2370) मोपेडला धडक दिली. तेव्हा, दोघी बहिणी खाली पडल्या, त्यांना किरकोळ दुखापत झाली. मात्र, त्यानंतर दोन तरुणांनी ऑटो चालकाला अमानुषपणे मारहाण करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पोलिसांनी चंदन सिंग आणि अभिषेक दुबे यांना अटक केली आहे.