पुणे - दहीहंडी उत्सव साजरा करताना ध्वनी प्रदुषण आणि वाहतूकीला अडथळा आणल्याने पोलिसांनी कार्यक्रम बंद करण्यास सांगितल्यानंतरही त्याला विरोध करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सहकार नगर पोलिसांनी अभिनेता संतोष जुवेकर यांच्यासह अरण्येश्वर दहीहंडी उत्सव मंडळाचे अध्यक्ष, स्टेज माल, साऊंड मालक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे़. अरण्येश्वर दहीहंडी उत्सव मंडळाचे अध्यक्ष सिद्धांत प्रधान, स्टेज मालक राजीवसिंग ठाकूर, साऊंट माल विजय नरुटे अशी गुन्हा दाखल झालेल्या इतरांची नावे आहेत़. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी फिर्याद दिली आहे़ अरण्येश्वर चौकात दहीहंडी उत्सव मंडळाने विनापरवाना सार्वजनिक ठिकाणी स्टेजची रोडवर बांधणी करुन त्यावर कार्यक्रम आयोजित केला होता़ मोठ्या क्षमतेची साऊंड सिस्टिम लावून जाणून बुजून ध्वनी प्रदुषण केले़ तसेच रहदारीला अडथळा निर्माण केला़ तेव्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी मंडळाच्या अध्यक्षांना कार्यक्रम बंद सांगितले़ त्यांनी कार्यक्रम बंद करण्यास विरोध करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़. बुधवार पेठेतील विजय शिवाजी तरुण मंडळ येथे दहीहंडीचा उत्सव साजरा करताना स्टेज कोसळल्याने पाच जण जखमी झाले होते़ सोमवारी रात्री पावणेदहा वाजता घडलेल्या या घटनेत पोलिसांनी मंडळावर गुन्हा दाखल केला आहे़ दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला पारितोषीक घेण्यासाठी स्टेजवर बोलावण्यात आले होते. स्टेजवर प्रमाणापेक्षा जास्त गर्दी झाल्याने स्टेज मधोमध दबले जाऊन कोसळले. यामध्ये पाच नागरिक किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती फरासखाना पोलिसांनी दिली. याप्रकरणी मंडळाचे अध्यक्ष साईनाथ माने, उपाध्यक्ष शंकर भोसले, कार्याध्यक्ष नवनाथ परदेशी आणी स्टेज ठेकदार दत्तात्रय हेलकरी याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी शिर्के यांनी दिली.
Dahi handi 2018 : अभिनेता संतोष जुवेकरविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2018 9:27 PM