अल्पवयीन मुलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 04:58 PM2018-12-28T16:58:36+5:302018-12-28T16:59:44+5:30

केंद्रीय मंत्रीमंडळाचा निर्णय; पॉक्सो कायद्यात मोठा बदल 

Death sentence for the accused of sexual exploitation of juvenile children | अल्पवयीन मुलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा

अल्पवयीन मुलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा

Next

नवी दिल्ली - संपूर्ण देशात लहान मुलांवरील लैंगिक शेषणाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच १२ वर्षांखालील लहान मुलांवर म्हणजेच अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी, यासाठी केंद्र सरकार कायद्यात बदल करणार असल्याचे आश्वासन महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी दिले आहे. यासाठी लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यात (पॉक्सो) बदल केला जाईल, असे मनेका गांधी यांनी म्हटले होते. त्याप्रमाणे केंद्रीय मंत्रिमंडळाने अखेर पॉक्सो कायद्यात मोठे बदल केले असून यापुढे लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा दिली जाणार आहे. 

 

Web Title: Death sentence for the accused of sexual exploitation of juvenile children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.