मुंबई - निलंबित डिआयजी निशिकांत मोरेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबईउच्च न्यायालय उद्या निर्णय देणार आहे. पनवेल सत्र न्यायालयाने मोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतले आहे. तळोजा पोलीस ठाण्यात पॉक्सोअंतर्गत मोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या मोरेंच्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली असून उद्या उच्च न्यायालय निर्णय देणार आहे.गेल्या सुनावणीदरम्यान अल्पवयीन मुलीच्या कथित विनयभंग प्रकरणातील आरोपी डीआयजी निशिकांत मोरे यांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. पनवेल सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास नकार दिल्यानंतर मोरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने त्यांच्या याचिकेवरील सुनावणी मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आली होती.
निशिकांत मोरे यांना तूर्तास दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकारपनवेल न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास नकार दिला नाही. त्यामुळे आपण त्यांच्या अर्जावर मंगळवारी विचार करू, असे न्या. प्रकाश नाईक यांनी मोरे यांना तत्काळ दिलासा देण्यास नकार देताना म्हटले, तसेच न्यायालयाने पुढील सुनावणीत मुलीने ज्या मोबाइल क्लिपद्वारे मोरे यांनी तिचा विनयभंग केला, असा दावा केला आहे, त्या क्लिपचा पंचनामा आणण्याचे निर्देशही तळोजा पोलिसांना दिले.