गर्लफ्रेन्डला द्यायचं होतं महागडं गिफ्ट, तरूणाने चाकूचा धाक दाखवत एकाला लुटलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 05:32 PM2021-08-21T17:32:25+5:302021-08-21T17:32:51+5:30

दिल्ली पोलिसांनी २२ वर्षीय व्यक्तीला चोरीच्या आरोपात अटक केली आहे. हा तरूणा दक्षिण-पश्चिम दिल्लीच्या डाबरी भागातील राहणारा असून त्याचं नाव विराट सिंह आहे.

Delhi boyfriend robs person to buy expensive gift for girlfriend | गर्लफ्रेन्डला द्यायचं होतं महागडं गिफ्ट, तरूणाने चाकूचा धाक दाखवत एकाला लुटलं

गर्लफ्रेन्डला द्यायचं होतं महागडं गिफ्ट, तरूणाने चाकूचा धाक दाखवत एकाला लुटलं

Next

प्रेमात पडलेले लोक आपल्या प्रेयसीला खूश करण्यासाठी नको नको ते करतात. पण दिल्लीतील एका तरूणाने गर्लफ्रेन्डला खूश करण्यासाठी जे केलं ते वाचून हैराण व्हाल. गर्लफ्रेन्डला वाढदिवसानिमित्त महागडं गिफ्ट देण्यासाठी २२ वर्षीय बॉयफ्रेन्डने एका व्यक्तीला चाकूचा धाक दाखवत लुटलं.

दिल्ली पोलिसांनी २२ वर्षीय व्यक्तीला चोरीच्या आरोपात अटक केली आहे. हा तरूणा दक्षिण-पश्चिम दिल्लीच्या डाबरी भागातील राहणारा असून त्याचं नाव विराट सिंह आहे. दिल्ली पोलिसांनुसार, शुक्रवारी आणि शनिवारी रात्री डाबरी पोलिसांना सूचना मिळाली. एका व्यक्तीने आरोप लावला की, जेव्हा तो घरी जात होता तेव्हा सीतापूर बसस्टॉपजवळ चार लोकांनी त्याचा मोबाइल, ५५०० रूपये आणि त्याचं आयकार्ड लुटलं. (हे पण वाचा : प्रेमासाठी कायपण! प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी प्रेयसीने स्वत:वर घडवून आणला Acid Attack आणि...)

पीडितानुसार, यादरम्यान एका आरोपीने त्याच्यावर चाकूने वारही केली. पोलीस आयुक्त संतोष कुमार मीणा यांनी या घटनेबाबत सांगितलं की, लुटीच्या या घटनेत सहभागी गुन्हेगारांबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी विराट सिंह याला अटक केली.

अधिकाऱ्यांनुसार चौकशी दरम्यान त्याने खुलासा केला की, तो गुडगांवमधील एका कॉल सेंटरमध्ये काम करत होता. पण लॉकडाऊन दरम्यान त्याची नोकरी गेली. पोलीस म्हणाले की, त्याला त्याच्या गर्लफ्रेन्डला वाढदिवसानिमित्त महागडं गिफ्ट द्यायचं होतं. आरोपी म्हणाला की, त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्याने त्याच्या मित्रांची मदत घेतली. पोलिसांनी चोरी केलेला मोबाइल ताब्यात घेतला. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
 

Web Title: Delhi boyfriend robs person to buy expensive gift for girlfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.