दिल्ली: एका ज्वेलर्समधून कोट्यवधी रुपयांचे दागिने चोरुन पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद शेख नूर असं आरोपीचं नाव असून त्यानं दिल्लीतल्या कालाकाजी परिसरातील अंजली ज्वेलर्समध्ये चोरी केली होती. पोलिसांनी त्याच्याकडून १३ कोटी रुपयांचे दागिने हस्तगत केले आहेत. मोहम्मदनं ज्वेलर्समधून तब्बल २५ किलो सोनं चोरुन पोबारा केला होता. मोहम्मद पीपीई किट घालून ज्लेवर्समध्ये शिरला होता.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद शेख नूर दुसऱ्या इमारतीवरून आत शिरला होता. शोरूमच्या मागे-पुढे ५ सशस्त्र सुरक्षारक्षक तैनात होते. मात्र तरीही यातल्या कोणालाही चोर आल्याचा सुगावा लागला नाही. चोरानं दागिने बॅगेत भरले आणि ती बॅग रिक्षातून नेली. फिल्मी स्टाईलनं करण्यात आलेली ही चोरी यंदाच्या वर्षातील सर्वात मोठी चोरी आहे.
VIDEO: ५ सशस्त्र रक्षकांचा पहारा असताना 'तो' पीपीई किटमध्ये आला अन् १३ कोटींचे दागिने लुटून गेला
By कुणाल गवाणकर | Published: January 21, 2021 1:23 PM