लहान मुलांसमोर महिलेला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण, CCTVमध्ये घटना कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 03:53 PM2021-12-01T15:53:28+5:302021-12-01T15:54:00+5:30
या घटनेनंतर पीडित महिलेने आम आदमी पार्टीच्या आमदारावर मारहाणीचा आरोप केला आहे.
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील शालीमार बाग परिसरात एका महिलेला अमानुष मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या अमानुष मारहाणीचा एक व्हिडिओही समोर आला आहे. 3 ते 4 जण महिलेला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करत असल्याचं त्या व्हिडिओत दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पाहा मारहाणीचा व्हिडीओ :
#WATCH | A group of persons beat up a woman with sticks in a residential colony in Shalimar Bagh area of Delhi on November 19
— ANI (@ANI) December 1, 2021
Based on the woman's complaint, Delhi Police has registered an FIR against unknown persons, it said.
(CCTV footage of the incident) pic.twitter.com/YmZRtD7COu
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 नोव्हेंबरच्या रात्री दिल्लीतील शालीमार बाग परिसरात महिला गाडीबाहेर पडताच दबा धरुन बसलेल्या एका टोळक्याने महिलेवर लाठ्या-काठ्यांनी अमानुष मारहाण केली. यावेळी लहान मुलेही समोर होती. या घटनेत जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असून, इत रआरोपींचा शोध सुरू आहे.
महिलेचा आमदारावर आरोप
या घटनेनंत रपीडित महिलेने स्थानिक आमदारावर मारहाणीचा आरोप केला आहे. महिलेला लाठ्या-काठ्यांनी इतका जबर मार लागला की ती रुग्णालयातून व्हील चेअरवर बाहेर यावं. महिलेने आम आदमी पार्टीच्या शालीमार बाग येथील आमदार वंदना कुमारी यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप केला आहे. पण, वंदना कुमारी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.