Delhi Violence : दिल्ली हिंसाचारप्रकरणी आज करणार आरोपपत्र दाखल, आपचा नगरसेवक देखील आरोपी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 03:08 PM2020-06-02T15:08:58+5:302020-06-02T15:11:28+5:30
गुन्हे शाखा फेब्रुवारीतील हिंसाचार प्रकरणात दोन आरोपपत्र दाखल करणार आहे.
गुन्हे शाखा आज दिल्लीच्या चांदबाग हिंसाचार प्रकरणात आरोपपत्र दाखल करणार आहे. या प्रकरणात आम आदमी पक्षाचे नगरसेवक ताहिर हुसैन, त्याचा भाऊ शाह आलम यांच्यासह 15 जण आरोपी आहेत. गुन्हे शाखा फेब्रुवारीतील हिंसाचार प्रकरणात दोन आरोपपत्र दाखल करणार आहे.
कड़कड़डूमा कोर्टात पोलिस आरोपपत्र दाखल करतील. पहिली आरोपपत्र चांदबागमधील हिंसाचाराशी संबंधित आहे. या प्रकरणात आपचा नगरसेवक ताहिर हुसैन आरोपी आहे. आपचे नगरसेवक ताहिर हुसैन यांच्यावर हिंसाचाराच्या वेळी छतावरुन पेट्रोल बॉम्ब फेकल्याचा आणि गोफणीच्या सहाय्याने दगडफेक केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी ताहिर हुसैन यांच्या घरातून पेट्रोल बॉम्ब जप्त केल्याचा पोलिसांचा दावा आहे. आरोपपत्रात हिंसाचाराच्या कटाचा उल्लेख आहे.
दिल्ली हिंसाचारप्रकरणी आज करणार आरोपपत्र दाखल, आपचा नगरसेवक देखील आरोपी https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) June 2, 2020
हॉटेल चालकांकडून लॉकडाऊनचे उल्लंघन, नऊ जणांविरुध्द गुन्हा दाखल
Delhi Voilence : पहिले आरोपपत्र दाखल, शाहरुखसह अनेकांना बनवले आरोपी
दुसरे आरोपपत्र जाफरबाद हिंसाचारासंबंधी आहे
दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दुसरे आरोपपत्र जाफराबादमधील हिंसाचाराशी संबंधित आहे. या प्रकरणात दोन मुलींनाही अटक केली आहे. मात्र, आजच्या आरोपपत्रात त्याचे नाव घेतलेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरवणी आरोपपत्रात पिंजरा तोडणार्या मुलींवरील आरोप कोर्टात सांगितले जाणार आहेत. जाफराबाद हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्रात इतर 10 जणांची नावे दिली आहेत. आरोपपत्रात याचा खुलासा केला जाईल. दिल्लीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निषेधाच्या वेळी दंगल उसळली. दंगलखोरांनी भीषण हिंसाचार निर्माण केला होत. या हिंसाचारात जवळपास 50 जणांचा मृत्यू झाला.