पत्नीची हत्या करून झुडपात फेकला मृतदेह, पोलिसांना फोन करून म्हणाला - 'मी माझ्या बायकोची हत्या केली'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 12:05 PM2021-08-28T12:05:28+5:302021-08-28T12:06:41+5:30

आरोपी दिल्लीचा राहणारा आहे. पण त्याने हे कृत्य फरीदाबादमध्ये केलं आहे. त्यामुळे या केसमध्ये दोन राज्याच्या पोलिसांचा समावेश आहे.

Delhi wife murder Faridabad corpse recovered accused husband call police crime | पत्नीची हत्या करून झुडपात फेकला मृतदेह, पोलिसांना फोन करून म्हणाला - 'मी माझ्या बायकोची हत्या केली'

पत्नीची हत्या करून झुडपात फेकला मृतदेह, पोलिसांना फोन करून म्हणाला - 'मी माझ्या बायकोची हत्या केली'

Next

फरीदाबादमधून हत्येची एक फारच धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका पतीने आपल्या पत्नीची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह झाडा-झुडपांमध्ये फेकून दिला. इतकंच नाही तर नंतर पोलिसांना त्यानेच फोन केला आणि सांगितलं की, त्याने पत्नीची हत्या केली आहे. तिचा मृतदेह झाडांमध्ये पडला आहे. आरोपी दिल्लीचा राहणारा आहे. पण त्याने हे कृत्य फरीदाबादमध्ये केलं आहे. त्यामुळे या केसमध्ये दोन राज्याच्या पोलिसांचा समावेश आहे.

झालं असं की, दिल्लीच्या कालिंदी कुंज पोलीस स्टेशनमध्ये एक फोन आला. फोन करणाऱ्याने सांगितलं की, त्याने हत्या केली. तो म्हणाला की, त्याने त्याच्या पत्नीची हत्या केली. तसेच तिचा मृतदेह कुठे पडला आहे हेही त्याने सांगितलं. महिलेचा मृतदेह फरीदाबाद भागात होता. त्यामुले फरीदाबाद पोलिसांना सूचना देण्यात आली. (हे पण वाचा : धक्कादायक! पतीनं पोलीस ठाण्याच्या परिसरातच कापला पत्नीचा गळा; घटनेनं एकच खळबळ)

फरीदाबाद पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्यांना दिल्लीच्या कालिंदी कुंज पोलीस स्टेशनमधून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी निजामुद्दीनने पत्नी रावियाची २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी चाकूने वार करत हत्या केली. राविया दिल्लीच्या सिव्हिल डिफेंसमध्ये नोकरी करत होती. या सूचनेच्या आधारावर पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले आणि महिलेचा शोध सुरू केला. महिलेचा मृतदेह रस्त्यापासून आत १०-१५ फुटावर सापडला.

पोलिसांनुसार, तरूणीचा मृतदेह आणि गळ्यावर कापल्याचे निशाण होते. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. त्यानंतर महिलेचे नातेवाईक आले आणि त्यांनी गुन्हा दाखल केला. त्यांनी पोलिसांना सांगितलं की, आरोपी निजामुद्दीनने त्यांच्या मुलीला नोकरी लावून देण्यात मदत केली होती. पण निजामुद्दीनने त्यांच्या मुलीसोबत लग्न केलं की नाही याबाबत त्यांना माहिती नाही.

महिलेच्या कुटुंबियांनी सांगितलं की, आरोपी महिलेच्या घरी येत-जात होता. दरम्यान आरोपीने पोलिसांना सांगितलं की, त्याने रावियासोबत कोर्ट मॅरेज केलं होतं. ज्याचा त्याच्याकडे काहीच पुरावा नाही. त्याने सांगितलं की, २६ ऑगस्टच्या रात्री पत्नीला बाईकवरून पाली रोडला घेऊन गेला होता आणि तिथेच त्याने तिच्यावर चाकूने हल्ला केला. मृतदेह फेकल्यावर तो दिल्लीला परत आला आणि पोलिसांना सूचना दिली. पोलीस पुढील कारवाई करत आहे.
 

Web Title: Delhi wife murder Faridabad corpse recovered accused husband call police crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.