महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून महिला अधिकाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 09:44 PM2018-10-25T21:44:42+5:302018-10-25T21:48:22+5:30
महापालिकेच्या ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयातील महिला अधिकाऱ्याकडे मुख्य आरोग्य निरीक्षकाने प्रत्यक्ष भेटून शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे़.
पुणे : महापालिकेच्या ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयातील महिला अधिकाऱ्याकडे मुख्य आरोग्य निरीक्षकाने प्रत्यक्ष भेटून शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे़.
याप्रकरणी एका ३१ वर्षाच्या महिला अधिकाऱ्याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी मुख्य आरोग्य निरीक्षकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे़.
बाळासाहेब साबळे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, या महिला अधिकारी जून २०१८ पासून महापालिकेच्या ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयात कार्यरत आहेत़ या पूर्वीही ते दुसऱ्या क्षेत्रीय कार्यालयात एकत्र कार्यरत होते़. त्यावेळीही साबळे तिला त्रास देत होते़.जून २०१८ ते २४ आॅक्टोंबर २०१८ दरम्यान साबळे यांनी या महिलेला वारंवार फोन करुन व प्रत्यक्ष भेटून शरीरसुखाची मागणी केली़. तसेच दुसऱ्या अधिकाऱ्यांना सांगून तिला कामासाठी माझ्याकडे एकटीला पाठव असे सांगत असे़ .या महिलेला कामानिमित्त २४ आॅक्टोंबर रोजी कोरेगाव पार्क येथे बोलावून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली़ तू मला खूप आवडते़. आपले संबंध आले तर कोणाला काही प्रॉब्लेम असणार नाही़ असे म्हणून तिला ते कॅबने विमाननगर येथे घेऊन जाणार होते़. पण तिने आॅफीसमध्ये काम आहे, असे सांगून त्यांना नकार दिला व त्या रिक्षासाठी जाऊ लागल्या़. तेव्हा त्यांनी तिचा हात धरला़. त्यांनी तो झिडकावून रिक्षाने ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयात आल्या़, असे फिर्यादीत म्हटले आहे़. साबळे हे त्रास देत असल्याचे त्यांच्या पतीला माहिती होते़. ते ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाजवळ आले होते़ .त्या आल्यानंतर दोघे जण बंडगार्डन पोलीस ठाण्यात आले व त्यांनी फिर्याद दिली़. त्यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी विनयंभगाचा गुन्हा दाखल केला आहे़.