सिनेसृष्टीत पुन्हा खळबळ; दिया मिर्झाच्या एक्स मॅनेजरला एसीबीने केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 09:11 PM2021-02-05T21:11:50+5:302021-02-05T21:12:52+5:30

Drug Case : काही दिवसांपूर्वी राहिला फर्निचरवाला आणि करण सजनानी या दोघांकडे २०० किलो गांजा सापडला होता.

Dia Mirza's ex-manager arrested by ACB | सिनेसृष्टीत पुन्हा खळबळ; दिया मिर्झाच्या एक्स मॅनेजरला एसीबीने केली अटक 

सिनेसृष्टीत पुन्हा खळबळ; दिया मिर्झाच्या एक्स मॅनेजरला एसीबीने केली अटक 

Next
ठळक मुद्देअलिकडेच एनसीबीने सुशांत सिंग राजपूतचा जवळचा मित्र आणि माजी असिस्टंट डायरेक्ट ऋषिकेश पवार याला अटक केली आहे

अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू झाल्यानंतर सिनेसृष्टीतील ड्रग्सचे रॅकेट उघडकीस आले. आतापर्यंत या प्रकरणी अनेकांची चौकशी करण्यात आली आहे. सिनेसृष्टीतील काही सेलिब्रिटींची नावदेखील समोर आली आहेत. यात काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दिया मिर्झाची एक्स मॅनेजर राहिला फर्निचरवाला आणि व्यावसायिक करण सजनानी यांची नावे समोर आली होती. त्यानंतर आता आज या दोघांना एनसीबीने बेड्या ठोकल्या आहेत. 

काही दिवसांपूर्वी राहिला फर्निचरवाला आणि करण सजनानी या दोघांकडे २०० किलो गांजा सापडला होता. त्यामुळे त्यांनी ३० जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबईच्या एस्प्लेनेट कोर्टाने हा निर्णय दिला होता. त्यानंतर आता एनसीबीकडून एक नवा खुलासा करण्यात आला आणि  अभिनेत्री दिया मिर्झाची एक्स मॅनेजर राहिला फर्निचरवाला आणि व्यावसायिक करण सजनानी यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, अलिकडेच एनसीबीने सुशांत सिंग राजपूतचा जवळचा मित्र आणि माजी असिस्टंट डायरेक्ट ऋषिकेश पवार याला अटक केली आहे. ऋषिकेश हा सुशांतच्या ड्रीम टीम प्रोजेक्टचा मॅनेजर होता. २०१८-१९ या वर्षात ऋषिकेषने सुशांतसोबत काम केलं आहे. मुंबईत चित्रपट अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूनंतर एनसीबीने अमली पदार्थ तस्कररांविरोधात कारवाई सुरु केली आहे. आतापर्यंत एनसीबीकडून ड्रग प्रकरणात फिल्म अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्यासह 25 नामांकित व्यक्तींना अटक करण्यात आली आहे आणि डझनभर नामांकित व्यक्तींची चौकशी केली आहे. गेल्या आठवड्यात एनसीबीने दाऊद इब्राहिमचे खास परवेझ खान ऊर्फ चिंकू पठाण आणि आरिफ भुजवाला यांना अटक केली होती. चिंकू पठाणच्या चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे एनसीबीच्या पथकाने माहीम येथे छापा टाकला आणि इतर अमली पदार्थ तस्करांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे. 

Web Title: Dia Mirza's ex-manager arrested by ACB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.