जमीर काझी
मुंबई - पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल प्रतिनियुक्तीवर दिल्लीत जाणार की राहणार या बाबतच्या चर्चेवर तूर्तास महिनाभरासाठी पडदा पडला आहे. दिल्लीचे मावळते पोलीस आयुक्त अमुल्य पटनायक यांना ३० दिवसाची मुदतवाढ देण्यास निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यामुळे जायसवाल सध्यातरी राज्यात राहणार हे निश्चित झाले आहे. पटनायक हे ३१ जानेवारीला निवृत्त होणार असल्याने त्याच्या जागी जायसवाल यांची निवड केली जाईल, अशी चर्चा गेल्या आठवड्याभरापासून रंगली होती .
डीजी सुबोध जायसवाल बनणार दिल्लीचे पोलीस आयुक्त ?
कोरेगाव भीमा दंगल तपास प्रकरण एनआयएकडे देण्यावरून राज्य व केंद्र सरकारमध्ये मोठा वादंग निर्माण झाला आहे. पार्श्वभूमीवर जायसवाल यांच्या बाबतचा निर्णय महत्वपुर्ण ठरला होता. केंद्र सरकारच्या मर्जीतले असलेल्या सुबोध जायसवाल दिल्लीचे आयुक्त बनल्यास त्याच्या जागेवर सेवाजेष्ठतेनुसार होमगार्डचे महासमादेशक संजय पांड्ये यांचा दावा होता. मात्र, फडणवीस सरकारने गेली ५ वर्ष त्यांना जाणीवपूर्वक आडगळीत ठेवले होते. त्यामुळे कोणाचाही मुलाहिजा न बाळगता कायद्याप्रमाने गैरप्रकारावर धडाकेबाज कारभार करणाऱ्या पांड्ये यांना महाविकास आघाडीचे सरकार न्याय देते की, त्यांना डावलून अन्य कोणाची नियुक्ती करते, याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले होते.
संभाव्य गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी पोलीसांनी गुन्हेगारांच्या तंत्रांचा अभ्यास करावा - मुख्यमंत्री
सुबोध जायसवाल हे १९८५ च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत. गेली अकरा महिने पोलीस महासंचालक म्हणून कार्यभार पाहत आहेत. त्यापूर्वी त्यांना जेमतेम आठ महिने मुंबईच्या आयुक्त म्हणून काम करता आले. त्यामुळे त्यांना प्रतिनियुक्तीवर दिल्लीच्या आयुक्त बनविण्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह याची इच्छा आहे, असे आयपीएस वर्तुळात चर्चा आहे.
मुंबई आयुक्त निवडी वेळीच होणार डीजीपीच्या नियुक्तीचा निर्णयमुंबईचे आयुक्त संजय बर्वे यांच्य वाढीव मुदतवाढ २८ फेब्रुवारीला संपत आहे. त्यावेळी मुंबईला दुसरा आयुक्त दिला जाणार आहे. आता दिल्लीच्या आयुक्तपदी जायसवाल यांची निवड झाल्यास त्याचवेळेस त्याच्या वारसदार निश्चित करावा लागणार आहे. मुंबई आयुक्तपदासाठी एसीबीचे प्रमुख परमबीर सिंग यांचे नाव सर्वाधिक आघाडीवर आहे. त्याशिवाय सेवा जेष्ठतेनुसार संजय पांड्ये, पोलीस गृहनिर्माण बिपीन बिहारी, कारागृहचे सुरेंद्र पांड्ये, राज्य सुरक्षा महामंडळचे के. कनकरत्नम, एफएसलेचे हेमंत नागराळे यांचा सेवा जेष्ठतेनुसार क्रम आहे.