डीजे बंद करण्यावरून पेटला वाद, वधूच्या चुलत भावाचा बेदम मारहाणीत मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 06:38 PM2021-11-30T18:38:51+5:302021-11-30T18:39:30+5:30

Murder Case : रामनगर विष्णुपूर येथील शेषनाथ सिंह यांचा भाऊ हरिश्चंद्र याचा मुलगा रोहित सिंग (23) याने वरात्यांना डीजे बंद करण्यास आग्रह केला. 

Dispute erupts over DJ shutdown, bride's cousin beaten to death | डीजे बंद करण्यावरून पेटला वाद, वधूच्या चुलत भावाचा बेदम मारहाणीत मृत्यू

डीजे बंद करण्यावरून पेटला वाद, वधूच्या चुलत भावाचा बेदम मारहाणीत मृत्यू

Next

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये हत्येचे गुन्हे थांबण्याचे नाव घेत नाही आहे. गोरखनाथ परिसरात लग्नसमारंभात डीजे बंद करण्याच्या वादातून रविवारी रात्री वधूच्या चुलत भावाला बेदम मारहाण करण्यात आली. लग्नाच्या आनंदाचे क्षणार्धात शोकात रूपांतर झाले.

गोरखनाथ पोलीस स्टेशन हद्दीतील रामनगर विशुनपूर येथील रहिवासी शेषनाथ सिंह यांची मुलगी प्रियंका हिचा विवाह रविवारी रात्री गोरखनाथ परिसरातील १० क्रमांक बोरिंग येथे असलेल्या रिमझिम मॅरेज हॉलमध्ये पार पडला. लग्नात पीपीगंज भागातील रामपती चौधरी यांचा मुलगा गौरव याची वरात आली होती.

लग्नाच्या वेळी रात्री उशीर होऊनही डीजेच्या तालावर लग्नाची वरात नाचत होती. दरम्यान, लग्नाचे विधी थांबवण्यात आले. अनेकवेळा सांगूनही डीजेवर नाचणारे तरुण डीजे बंद करायला तयार नव्हते. यानंतर रामनगर विष्णुपूर येथील शेषनाथ सिंह यांचा भाऊ हरिश्चंद्र याचा मुलगा रोहित सिंग (23) याने वरात्यांना डीजे बंद करण्यास आग्रह केला. 


दरम्यान, नाचणाऱ्या काही तरुणांनी वधूच्या बाजूने हाणामारी करून मारहाण करण्यास सुरुवात केली. ज्यामध्ये रोहितला तिथल्या वर पक्षाच्या बाजूने बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. कुटुंबीयांनी रोहितला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

दरम्यान, कसेतरी लग्नाचे विधी पार पडले. सकाळी लग्न उरकताच मुलीला सासरी पाठवण्यात आले. लग्नघरात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे.

रोहित अभ्यासासोबतच शटरिंगचे काम करत होता

याप्रकरणी एसपी सिटी सोनम कुमार यांनी सांगितले की, गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींचा शोध सुरू आहे. मृत रोहित हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. आयटीआयच्या शिक्षणासोबतच तो शटरिंगचे कामही करायचा. तर मृताचे वडील हरिश्चंद्र राजगीर हे मेस्त्री म्हणून काम करतात.
 

डीजे बंद करण्यावरून झालेल्या वादातून रोहितची हत्या झाल्याचे त्यांनी सांगितले. आयपीसी कलम 147, 148, 302, 323 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल चौधरी, स्वतंत्र चौधरी यांच्यासह सहा ते सात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे. 

 

Web Title: Dispute erupts over DJ shutdown, bride's cousin beaten to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.