पुणे : मुलीची छेडछाड केल्याप्रकरणातून झालेल्या भांडणातून तरुणावर लोखंडी रॉड, कोयत्याने वार करुन त्याला गंभीर जखमी करण्यात आले. याप्रकरणी वानवडीपोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे. बबलु चित्रु परदेशी (वय ५१), रिषभ, बबलु परदेशी (वय १९), आकाश पप्पापरदेशी (वय २८), राजू चित्रू परदेशी (वय ५९, रा़ गंगानगर, फुरसुंगी) वतीन महिलांना अटक केली आहे. ही घटना वानवडी गावातील छत्रपती शिवाजी पुतळासमोर ७ जून रोजी रात्री सव्वाआठ वाजता घडली. याप्रकरणी एका २५ वर्षाच्या महिलेने वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांच्या बहिणीच्या मुलीला आरोपीच्या बहिणीचा मुलगा छेडत होता. त्यावरुन त्यांच्यात १५ दिवसांपूर्वी भांडणे झाली होती. परंतु, त्यांनी आपसात मिटवून घेतल्याने कोणी तक्रार दिली नाही. त्यानंतर, फिर्यादी ,त्यांची आई व बहिण हे गप्पामारत घरासमोर बसले असताना आरोपी महिला तेथे आल्यावर त्यांनी त्यांना शिवीगाळ केली. त्यात त्यांच्यात झटापट झाली. त्यावेळी फिर्यादीचे मेव्हणे शक्ती बिडलान हे तेथे आले. त्यांना फिर्यादी यांनी घडलेला प्रकार सांगितले. त्याचवेळी सर्व आरोपी हातात लोखंडी रॉड, लाकडी स्टम्प, लोखंडी कोयता घेऊन आले व त्यांनी शक्ती बिडलान याच्या डोक्यावर, हातावर जबर मारहाण केली. त्यात शक्ती बिडलान हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन ७ जणांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक सलिम चाऊस अधिक तपास करत आहेत.