'माझ्यासाठी काय करू शकतेस?', यावर पत्नी म्हणाली - जीव देऊ शकते; पतीने केली हत्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 10:07 AM2023-02-20T10:07:12+5:302023-02-20T10:08:05+5:30
Crime News : या धक्कादायक घटनेबाबत पोलिसांनी सांगितलं की, बिथनी चैनपूरमध्ये मोहम्मद फारूख आलमचं एक क्लीनिक आहे. इथे तो रूग्णांवर उपचार करतो.
Crime News : उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातून व्हॅंलेंटाईन डे ला एका पतीने आपल्या पत्नीला एका प्रश्न विचारला. त्याने तिला विचारलं की, प्रेमात माझ्यासाठी काय करू शकते. यावर पत्नीने उत्तर दिलं की, मी तुमच्यासाठी जीव देऊ शकते. हे ऐकून त्याने पत्नीला बेदम मारहाण करत तिची हत्या केली. पोलिसांनी या घटनेचा खुलासा केला आहे आणि आरोपी डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.
या धक्कादायक घटनेबाबत पोलिसांनी सांगितलं की, बिथनी चैनपूरमध्ये मोहम्मद फारूख आलमचं एक क्लीनिक आहे. इथे तो रूग्णांवर उपचार करतो. नात्याने मेहुणी लागत असलेल्या तरूणीसोबत त्याचं अफेअर सुरू होतं. दोघांना लग्नही करायचं होतं. पण पत्नी नसरीनमुळे तो लग्न करू शकत नव्हता. त्यामुळे त्याने पत्नीला मार्गातून हटवण्याचा प्लान केला.
पोलिसांनुसार, कसून चौकशी केल्यानंतर फारूखने सांगितलं की, त्याने रात्री नसरीनला विचारलं की, 'तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. यावर ती म्हणाली की, मी तुझ्यासाठी माझा जीवही देऊ शकते. यानंतर त्याने ओढणीने तिचा गळा आवळला. नसरीनला वाटलं की, मी गंमत करत आहे. पण त्याने बघता बघता पत्नीची हत्या केली. त्यानंतर त्याने तिचा पोटावरही चाकूने वार केले.
त्यानंतर पतीने पत्नीच्या डोक्यावरही वार केला आणि सगळ्यांना चोरीची खोटी कहाणी सांगितली. इतकंच नाही तर त्याने घरातील सगळ्या वस्तू इतडे तिकडे फेकल्या. जेणेकरून ही चोरीची घटना वाटावी. सूचना मिळाल्यावर पोलिसांनी चौकशी सुरू केली. यादरम्यान आयपीएस चंद्रकांत मीना यांना आरोपीच्या जबाबात विरोधाभास दिसून आला. कसून चौकशी केल्यावर सत्य समोर आलं.
ही घटना सुरूवातीला बरेली पोलिसांना चोरी वाटली होती. वरिष्ठ अधिकारीही या घटनेवर नजर ठेवून होते. यादरम्यान सगळं सत्य समोर आलं. अधिकाऱ्यांनी या घटनेचा खुलासा करणाऱ्या पोलीस टीमसाठी 25 हजार रूपयांचं बक्षीस घोषित केलं आहे.