फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणं डॉक्टराला भोवली; पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 03:00 PM2019-05-16T15:00:31+5:302019-05-16T15:01:02+5:30
पार्कसाईट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला होती.
मुंबई - फेसबुकवर हिंदूंविरोधात तसेच ब्राम्हणांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहणाऱ्या एका डॉक्टरला मुंबई पोलिसांनीअटक केली आहे. सुनीलकुमार निषाद असं या अटक डॉक्टरचे नाव आहे. त्यांच्याविरोधात विक्रोळीचे रहिवासी असलेल्या रवींद्र तिवारी यांनी विक्रोळीतील पार्कसाईट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला होती. निषाद हे होमियोपथी डॉक्टर असून ते अटकपूर्व जामीन मिळवण्याच्या प्रयत्नात होता. मात्र त्यापूर्वीच त्याला अटक करण्यात आली.
निषाद यांच्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी ईव्हीएम मशिनबाबत शंका उपस्थित केल्या आहेत. तसेच साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याबाबतही आक्षेपार्ह लिखाण केल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस डॉक्टरच्या मागावर होते. अखेर त्या डॉक्टरला दक्षिण मुंबईतून काल पोलिसांनी अटक केली आहे. निषादला आज न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. याबाबत बोलताना पार्कसाईट पोलीस ठाण्याच्या सूत्रांनीतिवारी यांच्या तक्रारीवरून निषाद यांच्याविरोधात भा. दं. वि.कलम 295(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती दिली. धार्मिक भावना हेतुपुरस्कार दुखावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दोन दिवस निषादचा मग काढत शेवटी त्याला फोर्ट परिसरातील मुंबई विद्यापीठाजवळून अटक करण्यात आली.
मुंबई - फेसबुकवर हिंदू, ब्राम्हणांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहणाऱ्या एका डॉक्टरला मुंबई पोलिसांनी केली अटक https://t.co/fUWIufFuiq
— Lokmat (@MiLOKMAT) May 16, 2019