डोंगरी इमारत दुर्घटना प्रकरण : अधिकारी, ठेकेदार आणि ट्रस्टींविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 09:43 PM2019-07-23T21:43:20+5:302019-07-23T21:48:00+5:30
भा. दं. वि. कलम ३३८, ३०४ (अ) आणि ३४ अन्वये हा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.
मुंबई - डोंगरी परिसरातील तांडेल स्ट्रीट येथे असलेल्या कौसरबाग इमारत कोसळल्याची घटना १६ जुलै रोजी घडली. या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, पालिका, पोलीस आणि अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि बचाव कार्य केले. या इमारत दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर अजूनही जे. जे. रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी डोंगरी पोलीस ठाण्यात सर्व संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि ट्रस्टींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती डोंगरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भागडीकर यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली. भा. दं. वि. कलम ३३८, ३०४ (अ) आणि ३४ अन्वये हा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.
डोंगरी इमारत दुर्घटना प्रकरण : डोंगरी पोलीस ठाण्यात सर्व अधिकारी, ठेकेदार आणि ट्रस्टींविरोधात गुन्हा दाखल https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) July 23, 2019