पाच रुपयांच्या अर्जासाठी बसला ५० हजारांचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2019 08:45 PM2019-07-08T20:45:31+5:302019-07-08T20:49:00+5:30

डेजी नाडर (२७) असे या तरुणीचे नाव आहे.

Duped 50 thousand rupees for 5 rupees application | पाच रुपयांच्या अर्जासाठी बसला ५० हजारांचा फटका

पाच रुपयांच्या अर्जासाठी बसला ५० हजारांचा फटका

googlenewsNext
ठळक मुद्देगूगलवरील ठगांनी तिच्या खात्यातून ५० हजार रुपये काढले आहेत.काही मिनिटांतच तिच्या खात्यातून ४०,३५४ रुपये काढल्याचा संदेश त्यांच्या मोबाइलवर धडकला.

मुंबई - बस ट्रॅव्हल्सच्या पाच रुपयांच्या नोंदणी अर्जासाठी अंधेरीतील तरुणीला ५० हजारांचा रविवारी फटका बसला आहे. तिने गुगलवरून मिळालेल्या क्रमांकावरून वेबसाइटवर पैसे भरण्यास पुढाकार, घेतला आणि गूगलवरील ठगांनी तिच्या खात्यातून ५० हजार रुपये काढले आहेत. डेजी नाडर (२७) असे या तरुणीचे नाव आहे.
अंधेरीपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेजी हिने काकाला मदुराई येथे जाण्याकरिता आॅनलाइन पिंटा ट्रॅव्हल्स बसचा मोबाइल क्रमांक गूगलवर सर्च केला. तेथून मिळालेल्या मोबाइलवर झालेल्या संभाषणातून त्यांना वेबसाइटवर ५ रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार, वेबसाइटद्वारे त्यांनी ५ रुपये भरले. या व्यवहारानंतर, काही मिनिटांतच तिच्या खात्यातून ४०,३५४ रुपये काढल्याचा संदेश त्यांच्या मोबाइलवर धडकला.

Web Title: Duped 50 thousand rupees for 5 rupees application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.