ठळक मुद्देगूगलवरील ठगांनी तिच्या खात्यातून ५० हजार रुपये काढले आहेत.काही मिनिटांतच तिच्या खात्यातून ४०,३५४ रुपये काढल्याचा संदेश त्यांच्या मोबाइलवर धडकला.
मुंबई - बस ट्रॅव्हल्सच्या पाच रुपयांच्या नोंदणी अर्जासाठी अंधेरीतील तरुणीला ५० हजारांचा रविवारी फटका बसला आहे. तिने गुगलवरून मिळालेल्या क्रमांकावरून वेबसाइटवर पैसे भरण्यास पुढाकार, घेतला आणि गूगलवरील ठगांनी तिच्या खात्यातून ५० हजार रुपये काढले आहेत. डेजी नाडर (२७) असे या तरुणीचे नाव आहे.अंधेरीपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेजी हिने काकाला मदुराई येथे जाण्याकरिता आॅनलाइन पिंटा ट्रॅव्हल्स बसचा मोबाइल क्रमांक गूगलवर सर्च केला. तेथून मिळालेल्या मोबाइलवर झालेल्या संभाषणातून त्यांना वेबसाइटवर ५ रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार, वेबसाइटद्वारे त्यांनी ५ रुपये भरले. या व्यवहारानंतर, काही मिनिटांतच तिच्या खात्यातून ४०,३५४ रुपये काढल्याचा संदेश त्यांच्या मोबाइलवर धडकला.