फेसबुकवरबाईक विक्री करणं एका तरुणाला चांगलच महागात पडलं आहे. वसईत राहणा-या एका तरुणाने आपली बाईक विकण्यासाठी फेसबुकचा आसरा घेतला. मात्र, बाईक खरेदीसाठी आलेल्या चोरानं बाईक टेस्टींगच्या नावाखाली बाईकच चोरल्याची घटना घडली आहे. सध्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोराचा शोध घेतला.
लहू लक्ष्मण राठोड असे आरोपीचे नाव आहे. आपल्या पत्नीला शोधण्यासाठी चक्क रस्त्यावर पार्क असलेल्या मोटरसायकल चोरायचा. बायको मिळाली की मोटरसायकल तेथेच ठेवून देत असे. तसेच बाईकमधील पेट्रोल संपलं तरीही बाईक तेथेच ठेवायचा. वसई विरार शहरात एक कॅमेरा शहरासाठी या संकल्पनेतून दुकानदारांनी लावलेल्या कॅमे-यात हा चोरटा कैद झाला आणि माणिकपूर पोलिसांच्या तावडीत सापडला.
सीसीटिव्हीत हा सगळा प्रकार कैद झाला आहे. बाईक विक्री सुरु आहे. मात्र, विक्रिच्या नावाखाली चोरट्यांनी चक्क बाईकच पळवली. वसईत राहणाऱ्या एँसील्टन परेरा या इंजिनिअरिंगच शिक्षण घेणाऱ्या तरुणाने आपली के.टी.एम.आर.सी.३९० ही बाईक विकण्यासाठी “फेसबुक मार्केट प्लेस” वर आपली बाईक विकण्याची जाहिरात टाकली त्याला रिस्पॉन्स ही मिळाला. गुरुवार १० डिसेंबर रोजी लकी राजपूत या चोरटयाने एसील्टनशी कॉन्टेक्ट करुन, बाईक खरेदीची इच्छा दर्शवली आणि शनिवारी १२ डिसेंबर रोजी वसईतील एका गजबजलेल्या ठिकाणी भेटण्याच ठरवलं. दोघे भेटले ही माञ बाईक चालवून बघण्याच्या बाहण्याने चोरट्याने चक्क एसील्टनच्या समोरुन बाईक चालवून फरार झाला. वाट बघणा-या एसील्टनला आपणांस फसवलं गेल्याचं कळल्यावर त्यांन माणिकपूर पोलीस ठाणं गाठलं आणि चोराविरोधात तक्रार नोंदवली आहे. माणिकपूर पोलिसांनी एसील्टनची तक्रार नोंदवून, सीसीटिव्हीच्या आधारे चोरट्याचा शोध घेत आहेत.