बोंबला! परिवाराचं आपल्यावर किती प्रेम आहे, बघण्यासाठी तरूणाने रचलं स्वत:च्या अपहरणाचं नाट्य, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 04:15 PM2021-05-29T16:15:06+5:302021-05-29T16:28:49+5:30
मिर्झापूरच्या कटरा पोलीस स्टेशन भागातील ही घटना आहे. इथे राहणाऱ्या इश्तियाक नावाच्या तरूणाने स्वत:च्या अपहरणाची खोटी कहाणी रचली आणि घरातून बेपत्ता झाला.
उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. आपल्यावर परिवाराचं किती प्रेम आहे हे बघण्यासाठी तरूणाने स्वत:च्या अपहरणाचा प्लॅन केला आहे. मात्र, तो स्वत:च यात अडकला आणि पोलिसांनी त्याला अटक केली.
मिर्झापूरच्या कटरा पोलीस स्टेशन भागातील ही घटना आहे. इथे राहणाऱ्या इश्तियाक नावाच्या तरूणाने स्वत:च्या अपहरणाची खोटी कहाणी रचली आणि घरातून बेपत्ता झाला. घरातील लोकांनी त्याच्या अपहरणाची तक्रार पोलिसात दिली. अपहऱणाशी संबंधित केस असल्याने पोलिसांनीही लगेच सूत्र हलवली. (हे पण वाचा : लग्नाच्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी विवाहितेची आत्महत्या; पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल )
पोलिसांनी बेपत्ता तरूणाला शोधून काढलं. तरूणाची पोलिसांनी चौकशी केली तर समोर आलं की, अपहरणाची खोटी कहाणी तरूणाने स्वत:च रचली होती. अप्पर पोलीस अधिक्षक संजय कुमार यांनी सांगितले की, इमामबाडा येथील रहिवाशी असलमने तीन दिवसांपूर्वी आपला भाऊ इश्तियाकचं अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करत तक्रार नोंदवली होती.
पोलिसांनी इश्तियाकला प्रयागराजच्या सोराव भागातून शोधून काढलं. इश्तियाकने सांगितलं की, त्याला हे बघायचं होतं की, परिवारातील लोकांचं त्याच्यावर किती प्रेम आहे. हे बघण्यासाठीच तो घरातून निघून गेला होता आणि स्वत:च फोन करून एका व्यक्तीने अपहरण केल्याची घरी सूचना दिली. पोलिसांना चुकीची माहिती दिल्याप्रकरणी त्याला दंड ठोठावला आहे. (हे पण वाचा : धक्कादायक! प्रेमी युगुलाने महिलेचा गळा चिरून केली हत्या, दीड महिन्यानी उलगडलं हत्येचं गूढ)
संजय कुमार यांनी सांगितले की, इश्तियाकचा भाऊ असलमने पोलिसांना सूचना दिली होती की, काही लोकांनी त्याच्या भावाला उचललं आहे. पोलिसांनी चौकशी केली तर त्याचं लोकेशन प्रयागराजच्या सोरावमध्ये सापडलं. तो घरातील लोकांवर नाराज होऊन गेला होता. त्याला हे बघायचं होतं की परिवारातील लोकांचं त्याच्यावर किती प्रेम आहे.