वर्दी घालून नकली पोलीस बनली महिला, मास्क लावून आठवडाभर करत राहिली वसूली!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 04:02 PM2021-03-26T16:02:10+5:302021-03-26T16:07:08+5:30
महिला मास्क घालून कोरोना नियमांचं पालन न करणाऱ्या लोकांना घाबरवून-धमकावून त्यांच्याकडून पैसे काढत होती. ही महिला दुसऱ्या एका महिलेमुळे पकडण्यात आली आहे.
(Image Credit : AAjtak)
मध्य प्रदेशच्या रतलाम जिल्ह्यातून अजब घटना समोर आली आहे. इथे एक महिला पोलीस बनून लोकांकडून वसुली करत होती. महिला मास्क घालून कोरोना नियमांचं पालन न करणाऱ्या लोकांना घाबरवून-धमकावून त्यांच्याकडून पैसे काढत होती. ही महिला दुसऱ्या एका महिलेमुळे पकडण्यात आली आहे.
ही घटना रतलामची आहे. इथे एक विवाहित महिला नकली पोलीस बनली. ती महू रोडवरील बस स्टॅंडवर मास्क लावून काही दिवसांपासून दुकानदार आणि बसमध्ये चढत असलेल्या प्रवाशांकडून वसूली करत होती. एक दिवस अचानक या महिला पोलिसावर एका फळ विक्रेत्या महिलेला संशय आला. त्या महिलेने याची माहिती प्रशासनाला दिली. त्यानंत या महिलेला पैसे घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं.
ही महिला पोलिसांची वर्दी घालून मास्क घालून रोडवेड बस स्टॅंडवर वसुली करत होती. पकडली गेल्यावर तिने सांगितले की, ती जावरा येथील पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे. तिने तिचं नाव निकीता सांगितलं. या महिलेची सध्या चौकशी सुरू आहे.
असे सांगितले जात आहे की, महापालिकेच्या चालान कापणाऱ्या टीमच्या कर्मचाऱ्यांसोबत ही महिला गेल्या ५ ते ६ दिवसांपासून मास्क लावून लोकांकडून पैसे वसूल करत होती. संधी मिळताच लोकांकडून अवैध वसूलीही करत होती.