Amazon विरोधात गुन्हा, 'हे' औषध विकले जात होते प्रिस्क्रिप्शनशिवाय 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 06:35 PM2022-05-02T18:35:26+5:302022-05-02T18:36:47+5:30

FIR Against amazon.in : वेबसाईट त्याच्या विक्रीसाठी कोणत्याही प्रकारचे प्रिस्क्रिप्शन देखील विचारत नव्हतं.

Filed a FIR against Amazon, 'this' drug was being sold without a prescription | Amazon विरोधात गुन्हा, 'हे' औषध विकले जात होते प्रिस्क्रिप्शनशिवाय 

Amazon विरोधात गुन्हा, 'हे' औषध विकले जात होते प्रिस्क्रिप्शनशिवाय 

googlenewsNext

FIR Against amazon.in : अन्न आणि औषध प्रशासन (FDA) महाराष्ट्राने ई-कॉमर्स वेबसाइट Amazon (amazon.in) विरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. कंपनीच्या वतीने गर्भपाताच्या औषधांची ऑनलाईन विक्री होत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाला आढळून आले. वेबसाईट त्याच्या विक्रीसाठी कोणत्याही प्रकारचे प्रिस्क्रिप्शन देखील विचारत नव्हतं.

बिल न देता औषध डिलिव्हर

एफडीएला त्यांच्या तपासणीत आढळून आले की Amazon ने A-Kare ब्रँडच्या गर्भपात औषधाची ऑर्डर स्वीकारली होती. त्यासाठी ऑर्डरदाराकडून प्रिस्क्रिप्शनही मागितले नाही. काही वेळाने 'A-Kare' ब्रँडचे गर्भपाताशी संबंधित औषधही दिलेल्या पत्त्यावर पोहोचवण्यात आले. मात्र, त्यासोबत बिल दिले गेले नाही.

कबरीतून मृतदेह बाहेर काढून महिलेचे केलं पोस्टमॉर्टम, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण


दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने नोंद आहे विक्रेता आयडी 

डिलिव्हरीवर संबंधित औषध ओडिसातून आल्याचे दिसून आले. परंतु तपासणीत असे आढळून आले की, ओडिसातील कोणत्याही विक्रेत्याकडून औषधाची डिलिव्हरी झाली नसून विक्रेत्याचा आयडी दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने नोंदवण्यात आला होता. याआधीही अॅमेझॉनवर तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप झाला आहे. त्यावेळी कंपनीविरुद्ध एफआयआरही नोंदवण्यात आला होता.

Web Title: Filed a FIR against Amazon, 'this' drug was being sold without a prescription

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.