मुख्यमंत्र्यांच्या हेल्पलाईनवर खोटी तक्रार करणाऱ्याविरोधात तक्रार दाखल
By पूनम अपराज | Published: November 13, 2020 08:28 PM2020-11-13T20:28:52+5:302020-11-13T20:29:49+5:30
Crime News : विद्युत बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपासणीनंतर ही कारवाई केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हेल्पलाईन क्रमांकावर खोटी तक्रार दाखल केल्याबद्दल बल्ह पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्युत बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपासणीनंतर ही कारवाई केली आहे.
या प्रकरणाची नोंद एसपी शालिनी अग्निहोत्री यांनी केली आहे. तक्रारदार कनिष्ठ अभियंता, विद्युत विभाग, बल्ह या पदावर कार्यरत आहेत. आपल्या तक्रारीत ते म्हणाले की, नुकतीच लूणापानी येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने मुख्यमंत्र्यांच्या हेल्पलाईनवर विद्युत बोर्डाकडून त्यांचे मीटर बसविण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रार केली होती.
अनेक वेळा कार्यालयाच्या चकरा मारून देखील सुनावणी घेतली जात नाही. वरील व्यक्तीने केलेले सर्व आरोप निराधार आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्या व्यक्तीने त्याच्याशी कधीच कोणतीही चर्चा केलेली नाही. या खोट्या तक्रारीची चौकशी करण्याचे आवाहन कनिष्ठ अभियंत्याने सरकारला केले असून खोटी तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई केली जावी असे देखील सरकारला सांगितले.