पिंपरीत विवाहितेच्या छळ प्रकरणी पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 04:50 PM2019-02-16T16:50:48+5:302019-02-16T16:50:59+5:30

आरोपीने उच्चशिक्षित असल्याचे भासवुन लग्न केले. उच्चशिक्षित नसल्याचे निदर्शनास आले असून महिलेची फसवणूक केली आहे.

FIR against five accused due to married women torture | पिंपरीत विवाहितेच्या छळ प्रकरणी पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल 

पिंपरीत विवाहितेच्या छळ प्रकरणी पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल 

Next

पिंपरी : माहेरहून तीन लाख रुपये घेऊन यावेत, असा तगादा लावुन विवाहितेचा मानसिक, छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू, सासरे आणि दीर अशा पाच जणांविरुद्ध सांगवी पोलिसांकडे गुरूवारी गुन्हा दाखल झाला आहे. 
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम दामोदर पवार (वय २९,रा.पिंपळेगुरव), भाग्यश्री दामोदर पवार (सासू), रामेश्वर पवार (दीर), दामोदर पवार (सासरे) तसेच नातेवाईक अशा एकुण पाच जणांविरूद्ध पोलिसांकडे फिर्याद दाखल झाली आहे. तीन लाख रुपये माहेरहून घेऊन ये, शारीरिक, मानसिक त्रास दिला. मारून टाकण्याची धमकी दिली. आरोपीने उच्चशिक्षित असल्याचे भासवुन लग्न केले. उच्चशिक्षित नसल्याचे निदर्शनास आले असून महिलेची फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी महिलेच्या भावाची कागदपत्र, ११ तोळ्याचे दागिने, दुचाकी आरोपीने नेली आहे. सांगवी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत

Web Title: FIR against five accused due to married women torture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.